Russia Ukraine War: व्लादिमीर पुतीन यांच्या माजी पत्नीनं २० वर्षे लहान व्यक्तीसोबत केलंय लग्न, पाहा कोण आहे तो By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 05:48 PM 2022-03-11T17:48:38+5:30 2022-03-11T17:54:54+5:30
Vladimir Putin's former wife : युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात खलनायक बनले आहेत. या पुतीन यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला काही वर्षांपूर्वी घटस्फोट दिल्याचे अनेकांना माहिती नसेल. दरम्यान, पुतीन यांनी घटस्फोटानंतर अधिकृतरीत्या दुसरं लग्न केलं नसलं तरी त्यांच्या पहिल्या पत्नी ल्युडमिला यांनी दुसरे लग्न केले आहे युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात खलनायक बनले आहेत. या पुतीन यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला काही वर्षांपूर्वी घटस्फोट दिल्याचे अनेकांना माहिती नसेल. दरम्यान, पुतीन यांनी घटस्फोटानंतर अधिकृतरीत्या दुसरं लग्न केलं नसलं तरी त्यांच्या पहिल्या पत्नी ल्युडमिला यांनी दुसरे लग्न केले असून, त्यांचा दुसरा पती त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान आहे. जाणून घ्या कोण आहे त्यांचा दुसरा पती.
पुतीन यांच्या माजी पत्नी ल्युडमिला ह्यांचा पहिला पती आर्तुर हा त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान आहे. ते रशियन व्यावसायिक असून, हे दाम्पत्य फ्रान्समधील एका आलिशान महालात राहतात. हा बंगला फ्रान्समधील समुद्र किनाऱ्यावरील शहर रिबिट्स येथे आहे. या भागात अतिश्रीमंत उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे. पुतीन यांच्या माजी पत्नीच्या नावाने खरेदी केलेला बंगला केवळ आलिशानच नाही तर तेवढाच महागडाही आहे. तेथे ते आपले आलिशान जीवन जगत आहेत.
जेव्हा पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केला तेव्हा फ्रान्समध्ये ल्युडमिला यांच्या बंगल्याच्या दरवाजावर आणि बाहेरील कुंपणावर लोकांनी पुतीन यांच्याविरोधात निषेधाची वाक्ये लिहिली होती. अत्यंत महागड्या अशा या बंगल्यामध्ये सर्व सुख-सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे याला मिनी राजवाडा म्हटले तर वावगे ठरणार नाही.
दरम्यान, पुतीन यांची माजी पत्नी ल्युडमिला पुतीन ह्या ल्युडमिला अलेक्सांद्रोव्ना ओचेरेत्ना या कशा बनल्या. याची एक रंजक कहाणी आहे. ल्युडमिला या ६४ वर्षांच्या आहेत. तर त्यांचे पती आर्तुर ओचेरत्नी सुमारे ४४ वर्षांचे आहेत. त
पुतीन यांच्या पहिल्या पत्नीसोबत दुसरे लग्न करण्याचा घेतलेला निर्णय हा धाडसीच म्हटला पाहिजे. आर्तुर यांचा जन्म १९७८ मध्ये झाला. शिक्षणानंतर त्यांनी एका कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. ते काम करत असलेली कंपनी ही पुतीन यांचा राजकीय पक्ष आणि इतर कंपन्यांसाठी पार्ट्या आयोजित करण्याचे काम करत असे. मात्र आज एक मोठे व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे.
दरम्यान आर्तुर आणि ल्युडमिला यांनी २०१६ मध्ये गुपचूपपणे विवाह केला असे म्हटले जाते. आता या लग्नाला सहा वर्षे होत आली आहे. मात्र ओर्तुर यांच्याशी संबंधित सूत्रे सांगतात की, हा विवाहा २०१५ मध्येच झाला होता. तेव्हाच पुतीन आणि ल्युडमिला यांचा घटस्फोट झाला होता. दरम्यान, ल्युडमिला यांनी त्यांचे आडनाव बदलल्यानंतर रशियामधील लोकांना त्यांच्या दुसऱ्या विवाहाबाबत समजले होते.
दरम्यान, ल्युडमिला ह्या सोव्हियट युनियनची अधिकृत एअरलाइन्स असलेल्या एअरोप्लोतमध्ये एअर होस्टेस असताना एका परिचिताच्या घरी त्यांची आणि पुतीन यांची ओळख झाली होती. तेव्हाच त्या पुतीन यांना आवडल्या होत्या. तेव्हा पुतीन हे केजीबीमध्ये गुप्तहेर होते. मात्र तरीही ते या सुंदर एअर हॉस्टेसच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी १९८३ मध्ये विवाह केला होता.
या विवाहातून पुतीन यांना दोन कन्या झाल्या होत्या. त्यांचा आता विवाह झाला आहे. तसेच रशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते. मात्र पुतीन राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर त्यांच्यात आणि त्यांच्या पत्नीमध्ये मतभेद झाल्याची चर्चा सुरू झाली होती. अखेरीस पुतीन आणि ल्युडमिला यांनी २०१४ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती.
त्यानंतर ल्युडमिला यांची भेट आर्तुर यांच्याशी जवळीक वाढली. कदाचित ते एकमेकांना आधीपासून ओळखत असावेत. पुतीन यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर ल्युडमिला ह्या आर्तुर यांच्या अधिक जवळ आल्या. २०१४ मध्येच त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. नंतर काही काळाने त्यांनी विवाह केला.
खरंतर पुतीन यांनीच आर्तुर यांना प्रगतीपथावर नेत मोठ्या पदापर्यंत पोहोचवले होते. त्यामुळे काही लोक म्हणतात की, हे लग्न खरंतर लग्न नाही आहे. तर पुतीन यांच्या बेसुमार संपत्तीला मॅनेज करण्यासाठी पुतीन यांच्या सांगण्यावरून झालेलं आहे. मीडियामधूनही या विवाहाबाबत असेच दावे केले जात होते.
मात्र घटस्फोटानंतर पुतीन यांचं नाव अनेक महिलांशी जोडलं गेलं आहे. तसेच त्यांनी रशियन जिम्नॅस्ट एलिना काबेयोवा यांच्याशी सिक्रेट लग्न केले असून, त्यांना दोन मुले असल्याचा दावा केला जातो.