सोना ही सोना! पोलीस अधिकाऱ्याच्या घरात सोन्याचं टॉयलेट अन् झुंबर, समोर आले आलिशान घराचे फोटो....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 01:53 PM2021-07-22T13:53:25+5:302021-07-22T13:59:22+5:30

सफोनोवने बाथरूम तयार करण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च केला. इथे बोराक मिरर, एक मोठं झुमर आणि अनेक महागड्या वस्तू लावल्या आहेत.

रशियातील (Russia) एक पोलीस अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून निलंबित करण्यात आलं आहे. रशियाच्या स्टावरोपोल भागातील पोलीस कर्नल एलेक्सी सफोनोव (Alexey Safonov) वर ३५ अधिकाऱ्याना सोबत घेऊन माफिया गॅंग चालवण्याचा आरोप आहे आणि लाच घेण्याच्या आरोपात अटक केली आहे. अशात या पोलीस अधिकाऱ्याच्या आलिशान घराचे फोटो समोर आले आहेत आणि घरात जागोजागी सोनं लावलेलं आहे.

पोलीस अधिकारी एलेक्सी सफोनोवच्या घरातील शौचालय महागड्या वस्तूंनी सजवलं आहे. टॉयलेट सीट सोन्याची (Solid Gold Toilet) तयार करण्यात आली आहे.

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, ४५ वर्षी एलेक्सी सफोनोवने कथितपणे मोटार चालकांकडून जबरदस्ती वसुली केली आणि लाच घेतली. तसेच सफोनोवने एका गॅंगचं नेतृत्व केलं.

सफोनोवने बाथरूम तयार करण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च केला. इथे बोराक मिरर, एक मोठं झुमर आणि अनेक महागड्या वस्तू लावल्या आहेत.

पोलीस विभागाने सफोनोवच्या आलिशान घराचेही फोटो जारी केले आहेत. सफोनोवच्या लक्झरी बेडरूममध्ये गिल्ट वॉलपेपर, महागडे पडदे आणि एक शानदार बेड आहे.

त्याच्या बाथरूममध्ये आणि बेडरूममध्ये सोन्याने कलाकुसर केलेली आहे. किचनमध्ये संगमरवर लावला आहे. तर सोन्याचा मुलामा दिलेलं एक कपाटही आहे.

सफोनोवच्या घराच्या छताला, पायऱ्यांच्या रेलिंगवर आणि भींतींवर बारोक संगमरवराची टायलिंग आणि त्यावर गोल्ड प्लेटेड वर्क केलं आहे.

पोलीस विभागाने आतापर्यंत त्याच्याकडून २ लाख पाउंड म्हणजे साधारण २.०४ कोटी रूपये ताब्यात घेतले आहेत. अजूनही त्याची चौकशी केली जात आहे.