रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्या सीक्रेट पॅलेसचा भांडाफोड, फोटो पाहून व्हाल थक्क.....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 11:29 AM2021-01-28T11:29:11+5:302021-01-28T11:35:38+5:30

नवेलनी यांनी व्हिडीओत सांगितले की, हा महाल नो फ्लाय झोनमध्ये येतो आणि इथे काम करणारी कोणतीही व्यक्ती आत कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्या सीक्रेट महालाचा खुलासा झाल्यानंतर त्यांच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत. या सीक्रेट महालाचा खुलासा त्यांची कट्टर विरोधक आणि विरोधीपक्ष नेते एलेक्सी नवेलनी यांनी व्हिडीओतून केला आहे. १७ जानेवारीला नवेलनी यांना अटक करण्यात आली होती. ज्यानंतर त्यांनी व्हिडीओ जारी केला होता. एलेक्सी नवेलनी यांचा व्हिडीओ त्यांच्या टीमने अपलोड केलाय.

व्हिडीओमध्ये नवेलनी यांनी दावा केला आहे की, रशियाच्या राष्ट्रपतींकडे १० अब्ज रूपयांचा सीक्रेट महाल आहे. हा महाल दक्षिण रशियातील जेलेंजिक शहरात आहे. हा महाला ब्लॅक सीच्या किनाऱ्यावर बनवण्यात आलाय. जंगलाच्या मधोमध हा महाल १७० एकरात तयार केलाय. यात वाइनयार्ड, स्पा, कसीनो, हेलीपॅड आणि सिनेमा हॉल आहे. तसेच अनेक आधुनिक सुविधा आहेत.

याला पुतिन पॅलेस म्हटलं जात आहे आणि या प्रॉप्रटीची किंमत १.३७ बिलियन डॉलर म्हणजे १०० अब्ज रूपये सांगितली जात आहे.

असाही दावा केला जात आहे की, सीक्रेट महाल रशियातील सर्वात मोठी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि महालातून समुद्र किनाऱ्यापर्यंत एक सीक्रेट भुयारी मार्गही आहे.

नवेलनी यांनी त्यांच्या व्हिडीओत सांगितले की, महालाच्या आजूबाजूला गुप्तचर संघटनेचं नियंत्रण आहे. याच्या आजूबाजूची ७७ वर्ग किलोमीटर जमीन गुप्तचर एजन्सीच्या नजरेखाली आहे.

नवेलनी यांनी व्हिडीओत सांगितले की, हा महाला नो फ्लाय झोनमध्ये येतो आणि इथे काम करणारी कोणतीही व्यक्ती आत कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही.

नवेलनी यांनी दावा केला आहे की, त्यांच्या टीमने ड्रोनच्या मदतीने महाल आणि आजूबाजूचे फोटो काढले आहेत. मात्र, पुतिन यांनी यास नकार दिला आहे. ते म्हणाले की, या फुटेजमध्ये दाखवण्यात आलेला महाल त्यांचा नाही.

नवेलनी यांना १७ जानेवारीला अटक करण्यात आली होती. याआधी ऑगस्ट २०२० मध्ये त्यांना विष देण्यात आलं होतं. जर्मनीत त्यांच्यावर पाच महिने उपचार सुरू होते. आता त्यांना रशियात येताच अटक केली आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सरकार विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. तसेच नवेलनी यांच्या सुटकेची मागणी देखील केली जात आहे.