पुतिन यांचं मल-मूत्र गोळा करण्यासाठी सोबत असतात स्पेशल गार्ड, परराष्ट्र दौऱ्यावर लपवलं जातं हे गुपित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 07:57 PM2022-06-13T19:57:25+5:302022-06-13T20:04:32+5:30

हे स्पेशल बॉडीगार्ड पुतिन यांचे मलमूत्र गोळा करतात आणि ते एका सुटकेसमध्ये भरून मॉस्कोला पाठवतात.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) जेव्हा परराष्ट्र दौऱ्यावर असतात तेव्हा त्याच्यासोबत स्पेशल बॉडीगार्ड असतात. त्यांचे काम जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. माध्यमांतील वृत्तांनुसार, या स्पेशल बॉडीगार्ड्सचे काम पुतिन यांचे मल-मूत्र गोळा करणे असते.

हे स्पेशल बॉडीगार्ड पुतिन यांचे मलमूत्र गोळा करतात आणि ते एका सुटकेसमध्ये भरून मॉस्कोला पाठवतात. यासोबतच, राष्ट्रपतींच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करणे हेही या बॉडीगार्डचे काम असते.

फ्रेंच न्यूज मॅक्झिन पॅरिस मॅचमध्ये पत्रकार रेजिस जेंते यांनी रशियाच्या 13 वर्षांच्या पॉलिसीसंदर्भात लिहिले आहे. यात त्यांनी या गोष्टीचाही खुलासा केला आहे. "पुतिन यांचे मल-मूत्र गोळा करण्यासाठी अथवा एकत्र करण्यासाठी फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसचे एजेंट असतात आणि तेच हे मल मूत्र गोळा करून स्पेशल बॅगमध्ये परत रशियाला पाठवतात," असे त्यांनी लिहिले आहे.

खरच एवढं महत्वाचं आहे पुतिन यांचं मल-मूत्र? - पुतिन यांच्या प्रकृतीबाबत एजन्सीज अत्यंत सावध असतात. त्यांच्या स्टूलची तपासणी करून त्यांच्या शरिरात कुठला आजार तर नाही ना, हे तपासले जाते. याशिवाय, त्यांच्या आजारासंदर्भात इतर देशांना माहिती होऊ नये, यावरही लक्ष दिले जाते.

2019 मध्ये व्लादिमीर पुतिन सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असतानाच आपल्याला यासंदर्भात माहिती मिळाली होती. याशिवाय, जेव्हा पुतिन फ्रान्स दौऱ्यावर गेले होते, तेव्हा त्यांचे बॉडीगार्ड त्यांच्यासोबत बाथरूममध्येही जात होते, असा दावाही संबंधित पत्रकारेने केला आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या संदर्भातील अनेक गोष्टी लोकांना व्यवस्थितपणे माहीत नाहीत. अनेक देश पुतिन यांच्या आजारासंदर्भात माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना हे शक्य होऊ नेय, यासाठी पुतिन यांचे मलमूत्र परत रशियाला पाठवण्यात येते, असे म्हटले जाते.

विशेष म्हणजे, बऱ्याच दिवसांपासून पुतिन यांचे मल-मूत्र मॉस्कोला आणण्याचा नियम आहे, असा दावाही रशियन पत्रकाराने केला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, व्लादिमीर पुतिन सध्या कॅन्सरचा सामना करत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.