Secret Military Deal In China and Maldives; Alarm bells for India
ड्रॅगनचा डाव! चीन अन् मालदीवमध्ये सीक्रेट मिलिट्री करार; भारतासाठी धोक्याची घंटा By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 01:48 PM2024-03-05T13:48:18+5:302024-03-05T13:52:11+5:30Join usJoin usNext मालदीव आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये तणाव आणखी वाढताना दिसत आहे. ८५ भारतीय सैनिकांना देश सोडण्याचे आदेश दिल्यानंतर मालदीव सरकारने आता चीनसोबत दोन गुप्त लष्करी करार केले आहेत. हे करार चीन आणि मालदीव यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण संबंधांच्या नव्या अध्यायाची सुरुवात मानली जात आहे या करारांवर मालदीवचे संरक्षण मंत्री घसान मौमून आणि चिनी लष्कराचे मेजर जनरल झांग बाओकुन यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मालदीवच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हे करार गुप्त ठेवण्यात आले असून त्याबाबत कोणालाही माहिती दिली जात नाही. यापूर्वी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी देखरेख यंत्रणा तयार करण्याची घोषणा केली होती. लक्षद्वीप वाद आणि त्यांच्या चीन दौऱ्यापासून मालदीवचे राष्ट्राध्यक्ष भारताविरुद्ध सतत गरळ ओकत आहेत आणि अशी अनेक पावले उचलत आहेत ज्यामुळे भारताला धोका वाढू शकतो. माहितीनुसार, चीन मालदीवमध्ये शक्तिशाली रडार बसवू शकतो ज्यामुळे मालदीव भारताच्या प्रत्येक युद्धनौकेवर नजर ठेवू शकेल. या करारात अशी तरतूद आहे की चीन मालदीवला मोफत सैन्य देऊ शकतो असा मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला. मालदीवने चीनसोबतच्या या सौद्यांचा कोणताही तपशील स्वत:च्या लोकांसमोरही जाहीर केलेला नाही. त्यामुळे मालदीवच्या प्रसारमाध्यमांमध्ये ड्रॅगनच्या हेतूवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मालदीवमधील मुइज्जू या सत्ताधारी पक्षाने चीनशी नेहमीच जवळचे संबंध ठेवले आहेत. सर्वप्रथम २०१३ ते २०१८ या काळात तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांनीही चीनसोबत अनेक मोठे प्रकल्प राबवले ज्यामुळे संपूर्ण देश ड्रॅगनच्या कर्जाखाली दबला गेला. मालदीव अजूनही चीनचे कर्ज फेडत आहे. हे तेच यामीन आहेत ज्यांनी मालदीवमध्ये भारताविरुद्ध 'इंडिया आऊट' मोहीम सुरू केली होती. मुइज्जूही या इंडिया आऊट मोहिमेशी संबंधित होता. मुइज्जू यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भारत आणि मालदीवमधील संबंध रसातळाला गेले आहेत. मुइज्जू चीनशी सतत संबंध वाढवत आहे. मुइज्जू सत्तेवर येताच त्यांनी भारतीय सैनिकांना देशातून निघून जाण्यास सांगितले. त्यासाठी त्यांनी १० मे ही तारीखही निश्चित केली आहे. एवढेच नाही तर मुइज्जू आता कर्जबाजारीच्या काळात मालदीवची लष्करी क्षमता वाढवण्यावर भर देत आहे. मालदीवच्या राष्ट्रपतींनी पाकिस्तानचा मित्र तुर्कीसोबत हल्ला करणाऱ्या ड्रोनसाठी करार केला आहे. हे तेच ड्रोन आहेत ज्यांनी युक्रेनमध्ये रशियन सैन्याचा बराच विध्वंस केला आहे. सत्ता हाती घेतल्यानंतर, मुइज्जू पहिली व्यक्ती तुर्कीला गेली. मालदीवच्या नौदलासाठी शस्त्रास्त्रे खरेदी करता यावी आणि ती अधिक मजबूत करता यावी यासाठी मुइज्जू अमेरिकेकडून पैसेही मागत आहे. मुइज्जू या निर्णयांवरून हे स्पष्ट झाले आहे की, आगामी काळात भारत आणि मालदीव यांच्यातील सीमेवर तणाव वाढू शकतो. चीनचा हा धोका लक्षात घेऊन भारताने मालदीवपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मिनिकॉय बेटावर आयएनएस जटायू नौदल तळ बांधला आहे.टॅग्स :भारतचीनमालदीवIndiachinaMaldives