संसदेतील अश्लील व्हिडिओवरून ऑस्ट्रेलियात राजकीय भूकंप; खासदार वेश्यांना घेऊन आल्याचा गौप्यस्फोट By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 12:52 PM 2021-03-23T12:52:20+5:30 2021-03-23T14:07:26+5:30
Australia Parliament House sex acts for years exposed: ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये सरकारी अधिकारी अश्लिल कृत्यांमध्ये गुंग असल्याचे फोटो, व्हिडीओ लीक झाले आहेत. त्या आधी एका महिलेने संसदेच्या परिसरात तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप केला होता. या महिलेने सरकारच्या बड्या नेत्यांपासून मोठ्या अधिकाऱ्यांना हा प्रकार माहिती असूनही आरोपींवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप केला होता. ऑस्ट्रेलियामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एखाद्या देशासाठी पवित्र मानली जात असलेल्या संसदेमध्ये अश्लिल व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याने लोक रस्त्यावर उतरले आहेत. (A whistleblower has lifted the lid on years of alleged sex abuse in Australia’s parliament, saying he’d been sent so many explicit clips that he’s “become immune” to them.)
ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये सरकारी अधिकारी अश्लिल कृत्यांमध्ये गुंग असल्याचे फोटो लीक झाले आहेत. त्या आधी एका महिलेने संसदेच्या परिसरात तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप केला होता.
या महिलेने सरकारच्या बड्या नेत्यांपासून मोठ्या अधिकाऱ्यांना हा प्रकार माहिती असूनही आरोपींवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप केला होता.
ऑस्ट्रेलिया सरकारच्या एका महिला सल्लागाराने सांगितले होते की, 2019 मध्ये एका सहकाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला होता. मात्र, सरकारने या गुन्ह्यात कोणतीही कारवाई केली नाही. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाच्या काही शहरांमध्ये आंदोलनही झाले होते.
आता ऑस्ट्रेलियाचे वृत्तपत्र The Australian आणि चॅनेल 10 ने संसदेतील या अश्लिल कृत्याचे व्हिडीओ जारी केले आहेत. हे व्हिडीओ एका व्हिसलब्लोअरने लीक केले आहेत.
हे धक्कादायक व्हिडीओ बाहेर येताच संसदेतील महिला खासदार आणि सामान्या जनतेकडून पुन्हा एकदा तीव्र विरोध होऊ लागला आहे. सरकारकडून वेळेत कारवाई झाली नसल्याने लोक राग व्यक्त करत आहेत.
टॉम नावाच्या व्हिसलब्लोअरने ऑस्ट्रेलिया मीडियाला सांगितले की, सरकारी अधिकारी आणि खासदार नेहमी संसदेतील प्रेयर रुमचा वापर सेक्ससाठी करतात. खासदारांसाठी हायप्रोफाईल वेश्यादेखील संसदेत आणल्या जातात.
संसदेतील कर्मचारी नेहमी एकमेकांसोबत खासगी फोटो शेअर करतात. संसदेत अशी संस्कृती बनलीय की पुरुष जे हवे ते करू शकतात. संसदेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने कायदा मोडल्याचे वाटत नाही परंतू नैतिकदृष्या ते उघडे पडले आहेत, असे टॉमने सांगितले.
हा व्हिडीओ बाहेर आल्यानंतर एका स्टाफला लगेचच हटविण्यात आले आहे. सरकारने सांगितले की, कारवाई केली जाणार आहे.
कॅबिनेट मंत्री करेन एन्ड्रूज यांनी सांगितले की, आता मी आणखी गप्प राहू शकत नाही. महिला विभागाच्या मंत्री मैरिस पैने यांनी सांगितले की, संसदेतील या कल्चरबाबत चौकशी होणे गरजेचे आहे.