कुठे गोळ्या झाडून तर कुठे विषारी इंजेक्शन देऊन; जगभरात अशाप्रकारे दिला जातो मृत्युदंड By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 03:38 PM 2019-12-11T15:38:56+5:30 2019-12-11T15:53:06+5:30
गंभीर गुन्ह्यासाठी मृत्युदंड देण्याची पद्धत जगातील अनेक देशात प्रचलित आहे. भारतात फाशी देऊन मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाते. तर जगातील विविध देशांमध्ये काही ठिकाणी गोळ्या झाडून, विषारी इंजेक्शन देऊन किंवा शिरच्छेद करून मृत्यूदंड दिला जातो. आज जाणून घेऊन जगभरात प्रचलित असलेल्या मृत्युदंडाच्या विविध पद्धतींविषयी.
फाशी भारतामध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी ही फाशी देऊन केली जाते. भारताप्रमाणेच पाकिस्तान, मलेशिया, बोत्सवाना, टंझानिया, झाम्बिया, दक्षिण कोरिया आणि झिम्बाब्वेमध्येही मृत्युदंड देण्यासाठी गुन्हेगारांना फाशी दिली जाते.
फाशी, गोळ्या झाडून आणि दगडाने ठेचून अफगाणिस्तान आणि सुदान या देशांमध्ये फाशी, गोळ्या झाडून किंवा दगडाने ठेचून मृत्युदंड दिला जातो.
गोळ्या झाडून येमेन, थायलंड, बहरीन, टोगो, तुर्कमेनिस्तान, चिली, इंडोनेशिया, अर्मेनिया आणि घाना या देशात गुन्हेगारांवर गोळ्या झाडून त्यांना मृत्युदंड दिला जातो.
विषारी इंजेक्शन आणि गोळ्या झाडून गुन्हेगाराला विषारी इंजेक्शनचा डोस देऊन आणि गोळ्या झाडून मृत्युदंड देण्याची पद्धत चीनमध्ये प्रचलीत आहे.
विषारी इंजेक्शन फिलिपिन्स या देशात विषारी इंजेक्शन देऊन मृत्युदंड दिला जातो.
इलेक्ट्रिक शॉक, विषारी इंजेक्शन आणि गोळीबार अमेरिकेमध्ये मृत्युदंड देण्याच्या विविध पद्धती प्रचलित आहेत. अमेरिकेमध्ये विजेचा धक्का देऊन, विषारी इंजेक्शन देऊन, गोळीबार करून किंवा विषारी वायूच्या गॅस चेंबरमध्ये कोंडून मृत्युदंड दिला जातो.