घरीच पर्स विसरलेल्या महिलेचं चक्क पंतप्रधानांनीच भरलं शॉपिंगचं बिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 21:11 IST2019-04-08T21:08:06+5:302019-04-08T21:11:11+5:30

शॉपिंग करताना नेहमीच सोबत आपण पैसे बाळगतो, त्यासाठी वॉलेट प्रत्येकाजवळ असतं.
परंतु न्यूझीलंडमधील एक महिला शॉपिंगला जाताना पर्स न्यायचं विसरली.
क्राइस्टचर्चमधील एक महिला सोबत पर्स नेण्यास विसरली, तिच्याबरोबर तिच्या दोन मुलीही होत्या.
शॉपिंग करून झाल्यानंतर पैसे नसल्याची कल्पना आल्यावर त्या महिलेनं चक्क पंतप्रधानांची संपर्क साधला.
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी त्या महिलेच्या शॉपिंगचं बिल भरलं.