८ अब्ज रूपयांपेक्षा जास्त किंमतीच्या दागिन्यांची चोरी करणारे अटकेत, हिऱ्याची तलवार घेऊन झाले होते फरार By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 11:48 AM 2021-09-04T11:48:37+5:30 2021-09-04T12:03:51+5:30
संग्रहालयाचे प्रबंधन करणारे ड्रेसडेनच्या रॉयल पॅलेसने सांगितलं की, ज्या वस्तू चोरी झाल्यात त्यात एक तलवारही आहे. ज्याच्या मुठीवर नऊ मोठे आणि ७७० लहान हिरे लावलेले आहेत. जर्मनीमध्ये दोन वर्षाआधी म्हणजे २०१९ मध्ये झालेल्या सर्वात मोठ्या दरोड्या प्रकरणी पोलिसांनी सहा लोकांना अटक केली आहे. ही चोरी संग्रहालयात करण्यात आली होती. ज्यात १०० मिलियन यूरो म्हणजे साधारण ९ अब्ज रूपये किंमतीच्या अनेक हिरेजडीत कलाकृती गायब केल्या होत्या.
या सर्वात मोठ्या दरोड्या प्रकरणी पकडण्यात आलेले सर्व आरोपी जर्मन नागरिक आहेत आणि त्यांचं वय २२ ते २७ वर्षे दरम्यान आहे. त्यांच्यावर चोरी केल्यावर संग्रहालयात आग लावल्याचाही आरोप आहे.
२०१७ मध्ये दोन लोकांना बर्लिनच्या बोडे संग्रहालयातून १०० किलोची सोन्याची नाणी चोरी करण्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. पण २०१९ मध्ये झालेल्या दरोड्याने जर्मनीला हादरवून ठेवलं.
ऑटोमॅटिक गन, लोडेड रिवॉल्वर आणि सायलेंसरसोबत दरोडेखोरांनी कथितपणे २५ नोव्हेंबर, २०१९ मध्ये ड्रेसडेनमध्ये ग्रीन वॉल्ट संग्रहालयात दरोडा टाकला होता आणि तेथून ४,३०० पेक्षा जास्त हिऱ्याचे दागिने घेऊन फरार झाले होते. आरोपी पकडले गेल्यावरही त्यांच्याकडे बहुमूल्य दागिने सापडले नाहीत.
असं मानलं जात आहे की, दरोडेखोरांनी दरोड टाकण्यापूर्वी संग्रहालयाच्या चारही बाजूच्या स्ट्रीट लायटिंगची वीज कापली होती. जेणेकरून अंधाराला फायदा घेता येईल.
रिपोर्टनुसार, आरोपी जेव्हा बर्लिनकडे पळून जात होते तेव्हा कथितपणे एका अंडर ग्राउंड पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारला त्यांनी आग लावली. त्यामुळे १ मिलियन यूरोचं नुकसान झालं. पोलीस अजूनही चोरी केलेल्या वस्तूंचा शोध घेत आहेत. ज्या वस्तू चोरी झाल्या त्यात १८व्या शतकातील अमूल्य दागिने आणि शासक ऑगस्ट द स्ट्रॉंगच्या संग्रहातील अनेक किंमती दागिने होते.
संग्रहालयाचे प्रबंधन करणारे ड्रेसडेनच्या रॉयल पॅलेसने सांगितलं की, ज्या वस्तू चोरी झाल्यात त्यात एक तलवारही आहे. ज्याच्या मुठीवर नऊ मोठे आणि ७७० लहान हिरे लावलेले आहेत.