Snowy 'Sahar' to the hot desert
तप्त वाळवंटाला हिमगारव्याचा 'सहार' By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 03:42 PM2018-01-11T15:42:52+5:302018-01-11T15:46:53+5:30Join usJoin usNext बदललेल्या वातावरणामुळे जगातील सर्वात तप्त वाळवंट अशी ओळख असलेल्या सहारा वाळवंटात बर्फवृष्टी झाली आहे. गेल्या चाळीस वर्षांत तिसऱ्यांदा सहारामध्ये बर्फवृष्टी झाली आहे. वाळवंटातील काही भागांत वाळूवर सुमारे 40 सेमी जाडीचा बर्फाचा थर जमा झाला आहे. एरव्ही असह्य उष्णता आणि दूरदूरपर्यंत पसरलेल्या वाळूच्या डोंगराला बर्फवृष्टीमुळे एक वेगळेच रुप प्राप्त झालं आहे. अल्जेरियामधल्या एन सेफ्रा भागात ही बर्फवृष्टी झाली आहे. हा भाग सहारा वाळवंटातच येतो.