... so Google will close your Gmail account, preconceived notions
... तर गुगल तुमचं Gmail अकाऊंट बंद करणार, अगोदरच पूर्वकल्पना By महेश गलांडे | Published: November 17, 2020 06:41 PM2020-11-17T18:41:17+5:302020-11-17T18:50:01+5:30Join usJoin usNext जर तुमचं गुगलवर अकाऊंट असेल तर गुगल कंपनीच्या नवीन धोरणानुसार कंपनीकडून तुमचं अकाऊंट बंद केलं जाऊ शकतं. आपले गुगलवरील अकाऊंट किंवा मेल आयडी हा कंपनीकडून बंद होऊ नये, यासाठी माहिती ठेवणं तुमच्या गरजेचं आहे. जर गेल्या २ वर्षांपासून तुमचं गुगल अकाऊंट निष्क्रीय असेल तर, कंपनीच्या नवीन धोरणानुसार ते अकाऊंट बंद केले जाऊ शकते. त्या अकाऊंटवरील सर्वच कंटेंट हटविला जाईल. गुगलकडून यासंदर्भात अगोदर युजर्संना माहिती देण्यात येईल, त्यासाठी तुम्हाला मेलवर सक्रीय राहणेही गरजेचं असणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार दिग्गज टेक कंपनी असलेल्या गुगलने घोषणा केली आहे की, 2 वर्षांपासून निष्क्रीय असलेल्या अकाऊंटला बंद करण्यात येईल. कंपनीकडून 1 जून 2021 पासून नवीन धोरण अवलंबण्यास सुरुवात करण्यात येईल. कंपनीने सर्वच युजर्संना गुगल ड्राईव्ह, जीमेल आणि फोटो फिचरचा वापर करण्याचं आवाहन केलंय, ज्या युजर्संने गेल्या 2 वर्षांपासून आपले अकाऊंट वापरले नाही, त्यांना हे आवाहन करण्यात आलंय. नवीन धोरणानुसार युजर्संना 15 जीबीपर्यंतचा डेटा गुगल ड्राईव्ह आणि गुगल फोटोवर सेव्ह केला जाऊ शकतो युजर्संकडून 15 जीबी डेटा वापरण्यात आला असेल तर, त्यांना 100 जीबीच्या स्टोअरेजी सुविधा घ्यावी लागणार आहे. हे फिचर वापरण्यासाठी युजर्संना चार्ज द्यावा लागणार आहे. कंपनीच्या धोरणानुसार प्रतिमाह 100 आणि वर्षासाठी 1300 रुपये द्यावे लागणार आहेत. जर युजर्संना 200 जीबी स्टोअरेजचा प्लान घ्यायचा असेल तर, 210 रुपये प्रतिमहिना चार्ज द्यावा लागणार आहे. तसेच, 2टीबी आणि 10 टीबी डेटासाठी प्रतिमाह अनुक्रमे 650 आणि 3250 रुपये चार्ज द्यावा लागेल. टॅग्स :मुंबईगुगलऑनलाइनइंटरनेटMumbaigoogleonlineInternet