... so the yellow is given to the school bus
...म्हणून स्कूल बसला दिला जातो पिवळा रंग By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 09:17 PM2019-08-21T21:17:02+5:302019-08-21T21:20:15+5:30Join usJoin usNext मुलांना शाळेत सोडणारी स्कूल बस आपण नेहमीच पाहतो. परंतु स्कूल बसचा रंग हा पिवळाच का असतो हे बऱ्याच जणांना माहीत नसते. स्कूल बसचा उपयोग सर्वात पहिल्यांदा उत्तर अमेरिकेत 19व्या शतकात झाला होता. त्यावेळी चारचाकी वाहन नसल्यानं शाळेतल्या मुलांना आणण्यासाठी घोडागाडीचा वापर केला जात होता. 20व्या शतकात स्कूल बसनं घोडागाडीची जागा घेतली. त्या स्कूलबसवर नारंगी किंवा पिवळा रंग दिला जायचा. जेणेकरून दुसऱ्या वाहनांपासून ती वेगळी असल्याचं दिसून येईल. स्कूल बसना अधिकृत पिवळा रंग देण्याची सुरुवात 1939मध्ये उत्तर अमेरिकेत झाली आहे. भारत, अमेरिका आणि कॅनडासहीत जगभरात अनेक देशांमध्ये स्कूल बसला पिवळा रंग दिला जातो. आता हा रंगच या गाड्यांना ओळख बनला आहे.