तुम्ही असाल शाही...! आफ्रिकन राजाचा राज्याभिषेक सोहळा, भारतीयानं सिंहासनच रोखलं; नेमकं प्रकरण काय? By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 03:04 PM2022-10-31T15:04:44+5:302022-10-31T15:08:32+5:30Join usJoin usNext दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे फुटबॉल स्टेडियममध्ये मिसिझुलु का जेलिथिनी या आफ्रिकेच्या झुलु राजाचा राज्याभिषेक सोहळा करण्यात आला. ते आता देशाचे नवे झुलु महाराजा बनले आहेत आणि राष्ट्राध्यक्ष सिरिल रिम्फोमा यांनी त्यांना अधिकृतपणे प्रमाणपत्र सुपूर्द केले. पण या ४८ वर्षीय नवीन राजासमोर एक नवीन संकट उभं राहिलं आहे. महाराजांना अजून गादी मिळालेली नाही. कारण महाराजाचं सिंहासन भारतीय वंशाच्या एका सुतारानं तयार केलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पैसे न मिळाल्यानं सिंहासनाची डिलिव्हरी थांबवण्यात आली आहे. राजघराण्याला या सिंहासनासाठी कारागीर राजीव सिंह यांना सुमारे ४,५३,७१० रुपये द्यावे लागणार आहेत. अनेक आश्वासने देऊनही पैसे मिळाले नाहीत मिसिझुलु का जेलिथिनी यांना दक्षिण आफ्रिकेचे नवे राजा म्हणून घोषित करण्यात आले. १९७१ नंतर देशाच्या सरकारने झुलू राजाला राज्याभिषेक करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांना औपचारिकपणे दक्षिण आफ्रिकेच्या प्रभावशाली शाही शक्तीचे प्रमुख म्हणून घोषीत करण्यात आले. यावेळी दुर्मिळ तुंबूती लाकडापासून बनवलेले सिंहासन त्यांना देण्यात येणार होते मात्र अद्याप राजाला सिंहासन मिळालेलं नाही. राजासाठी दोन सिंहासनं बनवली जाणार होती. राजीव सिंग यांचे कुटुंब हे दुर्मिळ लाकडी फर्निचर बनवण्यात कुशल आहे. राजाचे वडील गुडविल जेलिथिनी यांना सात वर्षांपूर्वी त्यांच्या वतीने बनवून हे लाकडी सिंहासन देण्यात आल्याचे राजीव सांगतात. मात्र अनेक आश्वासनं देऊनही त्यांचं पेमेंट काही झालेलं नाही. अशा स्थितीत नव्या राजाच्या सिंहासनाची डिलिव्हरी रोखण्यात आली आहे. नवी ऑर्डर घेण्यास नकार राजीव सिंह म्हणाले, "मी काहीही डिझाइन केलेले नाही. मी खूप निराश झालो आहे आणि त्याच्या कुटुंबानं अजून आम्हाला पैसे दिलेले नाहीत. आम्ही त्यांना वारंवार विनंती करूनही अद्याप आमचे पैसे आम्हाला मिळालेले नाहीत. मी त्यांच्या प्रतिनिधीलाही पैसे देण्याबाबत सांगितलं. पेमेंटचं काय झालं ते शोधून काढू असं प्रतिनिधीनं सांगितलं" त्यानंतर सिंह यांच्याशी कोणीही बोललं नाही किंवा संपर्क देखील केला गेला नाही. पण कार्यालयातून पुन्हा सिंहासनाची मागणी करण्यात आली. पण आधीच पैसे मिळाले नसताना नवी ऑर्डर कशी घेणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सिंग यांना यावेळी पैसे मिळतील याची खात्री नाही. ते म्हणाले, 'आम्हाला पैसे न देण्याचा त्यांचा विचार दिसतोय. तुम्ही कदाचित राजेशाही असालही पण तुम्ही एखादी वस्तू विकत घेतली तर त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील", असं खडेबोल राजीव सिंह यांनी सुनावले आहेत. झुलू शाहीच्या प्रवक्त्याकडूनही यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.वडिलांची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख राजीव सिंह यांचे वडील कुबेर इदेव सिंह यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर एक कुशल सुतारकाम करण्यासाठी ओळखलं जात होतं. टिंबुटी लाकडी फर्निचर बनवण्यासाठी तो प्रसिद्ध आहेत. हे फर्निचर अनेक दशकांपासून बऱ्याच लोकांना दिलं गेलं आहे. आता सिंह यांच्याबाजूने मोबदला मिळण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. दोन सिंहासनांचे पेमेंट बाकी असल्याचे राजीव सिंह यांचे म्हणणे आहे. याशिवाय दिवंगत राजा जेलिथिनीच्या सात पत्नींसाठी एक शाही काठी, सात सिंहासन, दहा टेबल आणि तीन चहाचे ट्रेचे पैसे देखील अद्याप दिले गेलेले नाहीत.एलिझाबेथ यांच्याकडे ज्वेलरी बॉक्स कुबेर इदेव सिंह यांनी बनवलेले फर्निचर अनेक राज्यप्रमुखांनी वापरले आहेत. त्यांनी बनवलेला शाही लाकडी ज्वेलरी बॉक्स दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय यांना भेट देण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला आणि थाबो म्बेकी आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन आणि जॉर्ज बुश यांनाही इदेव सिंह यांनी हाताने बनवलेल्या भेटवस्तू देण्यात आल्या आहेत. कडक तंबुतीची झाडे १२०० वर्षांपर्यंत जुनी असतात.टॅग्स :द. आफ्रिकाSouth Africa