इंग्लंडमधल्या सर्वात मोठ्या लाइट फेस्टिव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 09:29 PM 2017-11-16T21:29:13+5:30 2017-11-16T21:41:34+5:30
इंग्लंडमधल्या सर्वात मोठ्या लाइट फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे.
या फेस्टिव्हलला रंगरूप देण्यासाठी जवळपास 29 कलाकारांनी सहभाग नोंदवला आहे.
लाइट फेस्टिव्हल 16 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर असे चार दिवस चालणार आहे.
अनेकांनी निसर्गातील झाडांसह मनुष्याच्या शरीराला विद्युत रोषणाईनं झगमगून टाकलं आहे.
नदी, चर्च, विद्यापीठ, गाला थिएटर अशी महत्त्वाची ठिकाणी विद्युत रोषणाईनं सजवण्यात आली आहेत.
इंग्लंडमधल्या लाइट फेस्टिव्हलच्या आयोजनाचं हे 15वं वर्षं आहे.
विशेष म्हणजे या फेस्टिव्हलच्या माध्यमातून छत्र्यांनाही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
चार दिवसांत या फेस्टिव्हलला जवळपास 200,000 लोक भेट देतील, अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली आहे.