state of old age people in india older population care finland
२४ तास केअर, मोफत उपचार अन् पेन्शन; परदेशात ज्येष्ठांना इतक्या सुविधा, आपण देऊ शकतो का? By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 09:40 AM2023-02-13T09:40:41+5:302023-02-13T09:55:13+5:30Join usJoin usNext समाज किंवा कुटुंबाचं सुख कोणत्या गोष्टीवरुन ओळखलं जातं तर शहरात ज्येष्ठांसाठी नेमकं कोणत्या प्रकारच्या सुविधा विकसीत करण्यात आल्या आहेत. भारतात युवांची संख्या सर्वाधिक असली तरी एकूण लोकसंख्येत १०.१ टक्के लोक ज्येष्ठ नागरिक आहेत. म्हणजेच ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. NSO च्या आकडेवारीनुसार साल २०२१ मध्ये देशातील ज्येष्ठांची लोकसंख्या १३ कोटी ८० लाख इतकी होती. जी येत्या दहा वर्षात म्हणजेच २०३१ पर्यंत ४१ टक्के इतकी होऊन आकडा १९ कोटी ४० लाख इतका होऊ शकतो. भारतात ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून पेन्शन व्यवस्था आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये तेथील सरकारच्या हिस्सेदारीनुसार ६०० ते १००० रुपये दरमहा पेन्शन मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय दिल्लीसारख्या राज्यांमध्ये मोहल्ला क्लिनिक, तर केंद्र सरकारकडून आयुष्मान भारत यासारख्या सरकारी योजनांमार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय उपचाराची सुविधा देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या लक्षात घेता या इतक्याच सुविधा पुरेशा आहेत का? आपण आपल्या ज्येष्ठांना पुरेशा प्रमाणात सामाजिक सुरक्षा आणि उपचार सुविधा देऊ शकतो आहोत का? असा सवाल उपस्थित होतो. इतर देशांमध्ये कोणत्या सुविधा? वर्ल्ड हॅप्पीनेस इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा फिनलँड देश एक छोटा देश जरी असला तरी येथील ज्येष्ठांसाठीच्या सुविधा तुलनेनं खूप विकसीत आहेत. फिनलँडमधील सोयी-सुविधा आणि व्यवस्थेकडून आपल्या देशातील शहर व्यवस्थापनांना खूप काही शिकण्यासारखं आहे. जपाननंतर फिनलँड देश लोकसंख्येत सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असलेला देश आहे. पण देशातील चांगल्या आरोग्य सुविधा आणि सामाजिक सुरक्षा यंत्रणेमुळे येथील लोकांची लाइफ एक्सपेटेंसी ८४ वर्ष इतकी आहे. फिनलँडमध्ये ६० वर्षाहून अधिक वयाचा प्रत्येक व्यक्ती पेन्शनसाठी पात्र आहे. तो त्याचा अधिकार आहे. फिनलँडची राजधानी हेलसिंकीमध्ये स्थानिक प्रशासनाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ओल्ड एज पेन्शनच्या माध्यमातून दरमहा १८८८ युरोंची मदत केली जाते. भारतीय रुपयाच्या तुलनेत ही रक्कम १ लाख ६५ हजार रुपये इतकी होते. याशिवाय शहर प्रशासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना शाररीक आणि सामाजिक स्तरावर सक्रीय ठेवण्यासाठी वेगवेगळी पावलं उचलली जातात. वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. ओल्ड एज होमला प्रोत्साहन देताना फिनलँड प्रशासन ज्येष्ठांना घरपोच हेल्थ केअर, मेडिकल चेकअप आणि इतर सुविधा उपलब्ध करुन देते. जेणेकरुन ज्येष्ठ मंडळी घरीच आराम करू शकतील आणि त्यांना उपचारासाठी हिंडत राहावं लागणार नाही. यासाठी स्थानिक संस्था ज्येष्ठांच्या घराच्या शिड्या, इंटेरिअर देखील बदलून देऊ शकते. जेणेकरुन ज्येष्ठांना घरात सहजतेनं वावरता यावं, चालता यावं आणि आवश्यक सामान सहज उचलता यावं याची काळजी घेतली जाते. ज्येष्ठांसाठी ऑन डोअर सेवा ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक ज्यांना मेडिकल देखभालीची गरज आहे अशा वृद्धांना आवश्यक अशा सुविधा ऑन डोअर उपलब्ध करुन दिल्या जातात. ज्येष्ठ नागरिक आपल्या राहत्या घरात सुरक्षित आणि काळजीसह राहावेत यासाठी २४ तास केअरिंग सुविधा देण्यात आली आहे. ज्येष्ठांसाठी कोहाऊसिंग, कम्युनिटी फूड, लॉन्ड्री, होम क्लिनिंग आणि क्लोथिंग सर्व्हीस सरकारकडूनच उपलब्ध करुन दिली जाते. याशिवाय दररोज घरी मेडिकल चेकअपसाठी नर्सिंग सुविधा आणि सामाजिक सुरक्षा सेवा दिली जाते. स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका आणि महापालिकांप्रमाणेच फिनलँडमध्ये म्युनिसिपलिटीजकडून अनेक सेवा दिल्या जातात. ज्येष्ठ नागरिकाची तब्येत ठीक नसल्यास डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर दररोज घरी मेडिकल चेकअप, नर्सिंग आणि रेग्युलर मेडिसीन देण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसंच पालिकेचा नर्सिंग स्टाफ नेमण्यात आला आहे की जो दररोज परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्यास सज्ज असतो. टॅग्स :ज्येष्ठ नागरिकSenior Citizen