वाऱ्याची झुळूक येताच डोलू लागते बिल्डिंग; पाहा जगातील सर्वात बारीक इमारत By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 05:19 PM 2023-11-28T17:19:01+5:30 2023-11-28T17:34:33+5:30
अमेरिकेच्या मॅनहॅट येथे स्थित असलेल्या या बिल्डिंगची सध्या जगभर चर्चा आहे. आणि चर्चेचा विषय म्हणजे या बिल्डिंगची रचना.आपण आज या बिल्डिंगबद्दल जाणून घेणार आहोत. अमेरिकेच्या मॅनहॅटन येथे स्थित असलेल्या या बिल्डिंगची सध्या जगभर चर्चा आहे. आणि चर्चेचा विषय म्हणजे या बिल्डिंगची रचना. आपण आज या बिल्डिंगबद्दल जाणून घेणार आहोत.
अमेरिकेत जगातील सर्वात बारीक (थीन) बिल्डिंग बांधण्यात आली आहे. असा दावा चक्क तेथील बिल्डिंग बांधलेल्या डेव्हलपर्सनी केला आहे.
जगातील सर्वाधिक बारीक असलेली ही बिल्डिंग स्टीनवे टॉवर या नावाने ओळखली जाते. या स्टॅनवे टॉवरची उंची साधारणत: १ हजार ४२८ फूट आहे आणि या बिल्डिंगमध्ये ४६ मजले असल्याचे सांगण्यात येत आहे.
१ हजार ४२८ फूट उंची असणाऱ्या या बिल्डिंगमध्ये तब्बल १५ हजार कोटी खर्च करुन निवासी टॉवर बांधण्यात आल्याचे सांगण्यात येते. ही बिल्डिंग वाऱ्यामुळे हलते पण ते बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना जाणवत नाही , असा दावा इंजिनिअरने केला आहे.
या ९१ मजली गगनचुंबी इमारतीमध्ये ४६ मजल्यावरील आणि डुप्लेक्स खोल्या आहेत. या बिल्डिंगच्या डिझायनर्सनी प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये चुनखडी, संगमरवरी, काळे पोलाद आणि मखमली रंगाच्या सजवलेल्या भव्य लॉबी, पिकासो आणि मॅटिस यांच्या मूळ कलाकृती दाखवल्या आहेत.स्टीनवे बिल्डिंगच्या आतील भाग स्टुडिओ सोफिल्डचे निर्माते विल्यम सोफिल्ड यांनी डिझाइन केले होते. विल्यम सोफिल्ड यांनी सीएनएनला दिलेल्या माहितीनुसार, या बिल्डिंगला एक वेगळेपण देण्याचा त्यांचा हेतू होता.