नोकरीवरुन काढल्यानंतर व्यवसाय बदलून 'शेफ प्रियांका' बनली स्टार; आता करते लाखोंची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:18 IST2024-12-18T15:13:09+5:302024-12-18T15:18:31+5:30
Chef Priyanka Success Story: आजच्या काळात, प्रत्येकजण नोकरीच्या शोधात आहे. कारण अचानक नोकरीवरून काढणे हा सर्वात मोठा धक्का आहे. पण एका भारतीय वंशाच्या तरुणीने या धक्क्यावरच आपली यशोगाथा लिहिली आहे.

कंपनीने कामावरुन काढण्याला एका तरुणीने आपली स्वप्ने पूर्ण करण्याची संधी म्हणून वापरलं आहे. भारतीय अमेरिकन महिला प्रियंका नाईकने एका टेक कंपनीतून काढून टाकल्यानंतर शेफ बनण्याचा प्रवास सुरू केला.
प्रियंका नाईकचे यश एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. लोक आता प्रियांकाला शेफ प्रियंका म्हणून ओळखतात, जी ट्विटरसारख्या मोठ्या कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करत होती. तंत्रज्ञानाच्या जगाला अलविदा म्हणत प्रियंका फूड नेटवर्कचा एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे. भारतीय वंशाच्या प्रियांकाने फूड नेटवर्क स्पर्धा जिंकली आणि आता ती सोशल मीडियावर स्वादिष्ट पदार्थांचे व्हिडिओ शेअर करून लाखोंची कमाई करते.
मी मोठ्या महाविद्यालयातून पदवीधर झाले नाही. मला माझ्या आयुष्यात अनेकदा नकाराचा सामना करावा लागला. मला कामावरून कमी केले. पण मी हार मानली नाही. आज मी एक चांगली शेफ, लेखक आणि टीव्ही होस्ट आहे. मला व्हाईट हाऊसकडून दिवाळी सेलिब्रेशनचे आमंत्रण मिळाल्यावर माझी सर्व धडपड यशस्वी ठरली, असं प्रियंका नाईकने म्हटलं.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रियांकाने इंजिनीअरिंग केले आणि एक्स म्हणजेच पूर्वीचे ट्विटर सारख्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली होते. प्रियांका तंत्रज्ञ नक्कीच झाली पण तिचे मन अजूनही स्वयंपाकघरातच होते. त्यामुळे प्रियांकाने स्वतःचा ब्लॉग तयार करण्यास सुरुवात केली आणि ती शेफ प्रियंका या नावाने प्रसिद्ध झाली.
शेफ बनल्यानंतरही प्रियांकाचे यश सोपे नव्हते. प्रियांका शाकाहारी कुटुंबातील होती. अशा परिस्थितीत जगातील सर्वात मोठ्या फूड फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणे आणि तेथे शाकाहारी जेवण देणे हे खूप आव्हानात्मक काम होते. तरीही प्रियांका खंबीरपणे उभी राहिली. प्रियांकाने तिच्या नोकरीच्या काळात स्वयंपाक हा फक्त तिचा छंद मानला होता. पण २०२२ मध्ये कोरोनाच्या लाटेनंतर कंपनीने तिला नोकरीवरून काढून टाकले. प्रियांकासाठी हा मोठा धक्का होता.
असं म्हणतात की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. ही म्हण प्रियांकाच्या बाबतीत अगदी खरी ठरते. प्रियांकाने तिच्या छंदाचे करिअरमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. प्रियांका आता यूट्यूब आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे कुकिंग व्हिडिओ शेअर करते. तिच्या प्रत्येक व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळतात, त्यामुळे प्रियांका घरी बसून लाखोंची कमाई करते.
व्हाईट हाऊसने तिला ऑक्टोबर २०२४ मध्ये दिवाळी सेलिब्रेशनसाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरी बोलावले होते. यावरुन प्रियांकाच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो या सोहळ्यात ६०० हून अधिक भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक सहभागी झाले होते आणि प्रियांका देखील त्यापैकी एक होती.