Sun and darkness are not seen here for 24 hours
24 तास दिसतो सूर्य, अंधार इथे होतच नाही By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 03:56 PM2018-03-02T15:56:45+5:302018-03-02T15:56:45+5:30Join usJoin usNext अमेरिकेच्या कॅनडाला लागून असलेल्या अलास्कामध्येही असं होतं. अलास्कामध्ये मे आणि जूनमध्ये सूर्यास्त होत नाही. या काळात रात्रीही सूर्यामध्ये बर्फ चमकताना पाहायला मिळतो. कॅनडामध्ये उन्हाळ्यातील किमान 50 तुम्हाला 24 तास सूर्याचं दर्शन घडत राहतं. फिनलँड, नॉर्वे, कॅनडा, आइसलँड येथे अनेकदा रात्र होतच नाही. फिनलँडमध्ये उन्हाळ्यात तब्बल 73 दिवस 24 तास सूर्य दिसत राहतो. आइसलँडमध्ये 10 मे ते जुलैच्या अखेरपर्यंत सूर्य कायमस्वरुपी उजेड देत राहतो. स्वीडनमध्ये तर 100 दिवस सूर्य मावळत नाही. मध्यरात्रीनंतर सूर्य मावळला, असं वाटेपर्यंत पहाटे 4.30 वाजता पूर्ण सूर्यादय असतो. नॉर्वेमध्येही 76 दिवस सूर्य जणू मावळतच नाही. मध्यरात्रीही दुपारसारखं उन्हं पडलेलं असतं. स्थानिकांना त्याची सवय झाली आहे. पण अन्य देशांतून काही दिवसांसाठी नेमक्या या काळात जे जातात. त्यांना खूपच त्रास होतो. तुम्हाला यापैकी एखाद्या देशात जायची संधी आलीच, तर उन्हाळ्यात जायचं टाळा