Sunita Williams: ना चपाती, ना भात, ना बिस्किट... सुनीता विल्यम्स यांनी २८६ दिवस अंतराळात काय खाल्लं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:51 IST2025-03-18T15:18:23+5:302025-03-18T15:51:26+5:30
Sunita Williams Homecoming: सुनीता विल्यम्स गेल्या २८६ दिवसांपासून अंतराळात अडकल्या आहेत.

गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या पृथ्वीवरील घरवापसीला आता काही तासच उरले आहेत.
आंतरराष्ट्रीय अंतराळ केद्रामधून स्पेसक्राफ्ट अनडॉक झालं असून ते भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे ३.३० वाजता समुद्रात उतरण्याची शक्यता आहे.
६१ वर्षीय बुच विल्मोर आणि ५९ वर्षीय सुनीता विल्यम्स गेल्या २८६ दिवसांपासून अंतराळात अडकले आहेत.
अंतराळ संस्थेचे डॉक्टर त्याच्या आहारावर आणि आरोग्यावर लक्ष ठेवून होते. मात्र लोकांच्या मनात त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल, ते नेमके काय खात आहेत याबद्दल प्रश्न पडले आहेत.
स्टारलाइनर मिशनशी संबंधित एका तज्ज्ञाने काही काळापूर्वी द पोस्टला सांगितलं होतं की ते दोघेही विविध प्रकारचं अन्न खात आहेत.
आहारात व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे पदार्थ होते. पावडर दुधासह धान्य, पिझ्झा, कोळंबी, कॉकटेल, रोस्ट चिकन आणि टूना फिश यांचा समावेश होता.
कोणतेही मांसाहारी पदार्थ आणि अंडी पृथ्वीवर शिजवली जातात आणि पॅक केली जातात. अंतराळात फक्त गरम केली जातात.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर प्रत्येक अंतराळवीराला दररोज जवळपास १.७२ किलो अन्न पुरवलं जातं.
बहुतेक अंतराळवीरांचं अन्न फ्रीज, ड्राय किंवा पॅक केलेलं असतं. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवरील फूड वॉर्मर वापरून ते पुन्हा गरम करता येतं.
मिशनच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी अन्न साठवण्याची सुविधा देखील आहे.