थोडीशी चूक आणि अंतराळातच होऊ शकते सुनीता विल्यम्स यांची वाफ, परतीच्या मार्गात ३ मोठे धोके

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 01:03 PM2024-08-21T13:03:43+5:302024-08-21T13:13:02+5:30

Sunita Williams In Space Update: अमेरिकेतील संशोधन संस्था नासा मध्ये कार्यरत असलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स मागच्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकून पडल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे एक सहकारी बुच विल्मोर हेही आहेत. अंतराळ यानात झालेल्या बिघाडामुळे त्यांच्या परतीचा प्रवास लांबणीवर पडलेला आहे. दरम्यान, या दोन्ही अंतराळवीरांना सुखरूप परत आणण्यासाठी नासा प्रयत्नशील आहे.

अमेरिकेतील संशोधन संस्था नासा मध्ये कार्यरत असलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स मागच्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकून पडल्या आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे एक सहकारी बुच विल्मोर हेही आहेत. अंतराळ यानात झालेल्या बिघाडामुळे त्यांच्या परतीचा प्रवास लांबणीवर पडलेला आहे. दरम्यान, या दोन्ही अंतराळवीरांना सुखरूप परत आणण्यासाठी नासा प्रयत्नशील आहे.

दरम्यान, अमेरिकेचे माजी मिलिट्री स्पेस सिस्टिम कमांडर रुडी रिलोल्फी यांच्या एका वक्तव्यामुळे सुनीता विल्यम्स यांच्या सुखरूप परत येण्याबाबतची चिंता वाढली आहे. डेली मेलशी बोलताना रिडोल्फी यांनी स्टारलायनरच्या परतीच्या प्रवासाच्या मोहिमेतील तीन संभाव्य धोक्यांबाबत माहिती दिली आहे.

रिडोल्फी यांनी सांगितले की, जर खराब अंतराळ यानामधून परतीसाठी प्रयत्न केले गेले, तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. त्यांनी तीन संभाव्य धोकादायक परिणामांची शक्यता वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुनीता विल्यम्स यांच्या परतीच्या प्रवासामध्ये काय काय गडबड होऊ शकते, हे आपण थोडक्यात पाहुयात.

रिडोल्फी यांनी केलेल्या दाव्यानुसार, सुरक्षितपणे पृथ्वीवर परतण्यासाठी स्टारलायनरच्या सर्व्हिस मॉड्युलने कॅप्सूल योग्य कोनामध्ये ठेवली पाहिजे. जर अलायमेंटमध्ये चूक झाली तर त्याचे परिणाम भयंकर होतील. रिडोल्फी यांनी सांगितले की, जर कॅप्सूल योग्य पद्धतीने लाइनअप झाली नाही तर तर पृथ्वीवर परतताना ती जळून खाक होईल किंवा अंतराळात परत फेकली जाईल. जर सर्व्हिस मॉड्युलने कॅप्सूलला खूप अधिक कोनामध्ये ठेवलं तर हिट शिल्ड फेल होऊ शकते. त्यामुळे कॅप्सूलचं तापमान प्रचंड वाढू शकतं.

रिडोल्फी यांच्या म्हणण्यानुसार पहिली शक्यता आहे ती म्हणजे स्टारलायनर खराब थ्रस्टर आणि केवळ ९६ तास पुरेल एवढ्या ऑक्सिजन पुरवठ्यामुळे अंतराळातच अकडू शकते. कॅप्सुल चुकीच्या पद्धतीने परत आणण्याच्या प्रयत्नांदरम्यान, वातावरणाशी होणाऱ्या घर्षणामुळे असं घडू शकतं.

दुसऱ्या शक्यतेनुसार चुकीच्या अलायनमेंटमुळे अंतराळयान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्यास अपयशी ठरेल. त्यामुळे ते अंतराळातच अडकून पडेल.

रिडोल्फी यांनी वर्तवलेली तिसरी शक्यता अधिक भयंकर आहे. त्यानुसार जर कॅप्सुल वातावरणामध्ये अधिक अँगलने प्रविष्ट झाली, तर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या घर्षणामुळे ती जळून जाईल. तसेच त्याच्यामध्ये बसलेल्या अंतराळवीरांची वाफ होऊन जाईल.