सुपरबगचा जगभर कहर! वर्षभरात 1 कोटी लोकांना गमवावा लागू शकतो जीव; रिसर्चमध्ये खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 02:54 PM 2022-09-14T14:54:39+5:30 2022-09-14T15:11:00+5:30
Superbug Disease : मेडिकल जर्नल लॅन्सेटच्या रिपोर्टनुसार, यूकेच्या एका संशोधकाने सांगितले की, येणाऱ्या काळात या आजारामुळे दरवर्षी 1 कोटी लोक आपला जीव गमावतील. या घातक आजाराबाबत जाणून घेऊया... अमेरिकेला घाबरवणारा सुपरबग आता जगातील सर्वात घातक आजार म्हणून समोर येत आहे. कोरोना महामारीनंतर आता सुपर बगने जगात कहर करायला सुरुवात केली आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन डिपार्टमेंट (CDC) च्या अहवालानुसार, या आजारावर कोणत्याही औषधाचा परिणाम होत नाही.
आशिया खंडात, भारतात हा आजार मोठ्या प्रमाणावर बळी घेत आहे. मेडिकल जर्नल लॅन्सेटच्या रिपोर्टनुसार, यूकेच्या एका संशोधकाने सांगितले की, येणाऱ्या काळात या आजारामुळे दरवर्षी 1 कोटी लोक आपला जीव गमावतील. या घातक आजाराबाबत जाणून घेऊया...
सुपरबग हा बॅक्टेरिया, व्हायरस आणि पॅरासाइटचा एक स्ट्रेन आहे जो अँटीबायोटिकच्या गैरवापरामुळे उद्भवतो. सुपरबग बनल्यानंतर तो कोणत्याही प्रकारच्या औषधांनी मरत नाही आणि लोकांचे प्राण घेतो. CDC नुसार, सुपरबग एकट्या अमेरिकेत दरवर्षी 50,000 लोकांचा बळी घेतात.
यूएसमध्ये प्रत्येक 10 मिनिटांनी सुपरबग एका व्यक्तीचा बळी घेत आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात हा आकडा खूपच भयावह आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थनुसार, सुपरबगमुळे अमेरिकन लोकांमध्ये इतर कोणत्याही आजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. सुपरबगला वैद्यकीय क्षेत्रात अँटी मायक्रोबियल-प्रतिरोधक म्हणूनही ओळखले जाते.
सुपरबग हा एक विशेष प्रकारचा रोग आहे जो कमी करता येतो, पण थांबवता येत नाही. कालांतराने बॅक्टेरिया, व्हायरस आणि परजीवी यांसारखे सूक्ष्मजंतू त्यांना मारण्यासाठी तयार केलेल्या औषधांशी जुळवून घेतात. कोणत्याही प्रतिजैविक औषधाच्या अतिवापरामुळे सुपरबग उद्भवतात.
डॉक्टरांच्या मते, फ्लूसारखा विषाणूजन्य संसर्ग असल्यास, अँटीबायोटिक्स घेतल्यास सुपरबग होण्याची शक्यता असते, ज्यामुळे हळूहळू इतर मानवांना संसर्ग होतो. द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्च पेपरनुसार, ब्रिटनमध्ये केलेल्या अभ्यासानुसार सुपरबगमुळे दरवर्षी सुमारे 1 कोटी लोकांचा मृत्यू होतो. आतापर्यंत तीन वर्षांत सुमारे 65 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सुपरबग एका वर्षात 1 कोटी लोकांचा बळी घेऊ शकतात. सध्या भारतात सुपरबगमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 13 टक्के आहे, जे कोरोनापेक्षा 13 पट जास्त आहे. सुपरबगमुळे दर दहा मिनिटांनी एका अमेरिकन व्यक्तीच्या मृत्यूची चिंता व्यक्त करत अमेरिकेने यावर 'यूएस नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर कॉम्बेटिंग अँटीबायोटिक-रेझिस्टंट बॅक्टेरिया' या टास्क फोर्सची स्थापना केली आहे.
अमेरिकेलाही दरवर्षी सुपरबगमुळे मोठे नुकसान सहन करावे लागते. या आजारामुळे अमेरिकेला सुमारे 5 बिलियन डॉलरचे नुकसान सहन करावे लागले आहे. जे भारताच्या एकूण आरोग्य बजेटच्या निम्मे आहे. यूएस हेल्थ एजन्सीनुसार, कोरोनामुळे अँटीबायोटिकचा वापर वाढल्याने सुपरबगच्या मृत्यूमध्ये 15 टक्के वाढ झाली आहे.
मार्च 2020 ते ऑक्टोबर 2020 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कोरोनाने रूग्णालयात दाखल झालेल्या सुमारे 80% रुग्णांना अँटीबायोटिक देण्यात आली ज्यामुळे सुपरबगची प्रकरणे झपाट्याने वाढली. सुपरबगचा प्रादुर्भाव पाहता अमेरिकेत कोरोनासाठी बांधलेली अनेक रुग्णालये सुपरबगच्या उपचारासाठी बदलावी लागली.
मेडिकल जर्नल लॅन्सेटच्या अहवालानुसार, दरवर्षी सुपरबग जगभरात 50 लाख लोकांचा बळी घेत आहेत. सुपरबग इतर रोगांपेक्षा लोकांमध्ये वेगाने पसरतो. अहवालानुसार, सुपरबगमुळे सर्वाधिक मृत्यू पश्चिम आफ्रिकेत झाले आहेत. त्याच वेळी, भारतात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे.
सुपरबगवर कोणत्याही औषधाच्या नगण्य परिणामामुळे अनेक मृत्यू झाले आहेत. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, अँटिबायोटिक्सच्या अतिवापरामुळे, शरीरातील बॅक्टेरिया स्वतःच सुपरबगमध्ये बदलतात, ज्यामुळे लोकांचा मृत्यू होतो. रुग्णातून पसरून हे सुपरबग इतर निरोगी लोकांनाही आपला बळी बनवतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.