Surprise! The population of this country is only 27
आश्चर्य ! 'या' देशाची लोकसंख्या फक्त 27 By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 11:09 PM2019-04-04T23:09:32+5:302019-04-04T23:14:41+5:30Join usJoin usNext तुम्हाला असा देश माहीत आहे का ज्याची लोकसंख्या फक्त 27 आहे. जर तुम्हाला माहीत नसल्यास सांगू इच्छितो की, इंग्लंडच्या समुद्रकिना-यालगत सीलँड हा देश आहे. इंग्लंडच्या सफोल्ड या समुद्रकिना-यापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या सीलंड किल्ल्यावर हा देश वसला आहे. दुस-या महायुद्धात इंग्लंडनं या देशाची निर्मिती केली होती. सीलँडवर आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांनी राज्य केलं आहे. 9 ऑक्टोबर 2012ला रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीला सीलँडचा राजा घोषित करण्यात आलं होतं. रॉय यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा मुलगा मायकल यांनी राज्य केलं. ज्या देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली नसते त्यांना छोटे देश म्हणून संबोधण्यात येते. सीलँड या देशाचे क्षेत्रफळ 250 मीटर (0.25 किलोमीटर) एवढी आहे. भकास अवस्थेत असलेल्या या किल्ल्याला सीलँडसोबत रफ फोर्ट म्हणूनही ओळखले जाते. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सTravel Tips