Taking selfies in phuket beach Sentenced to death
या बीचवर सेल्फी काढला तर होणार मृत्युदंडाची शिक्षा; By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 06:27 PM2019-04-12T18:27:41+5:302019-04-12T18:32:36+5:30Join usJoin usNext मोबाईल कॅमेरा आल्यापासून सेल्फी घेण्याचं वेड सगळ्यांनाच लागले आहेत. काही वेळेला तर सेल्फीमुळे अनेकांचे जीव गेल्याच्याही घटना घडल्या आहेत मात्र सेल्फी घेण्याचं वेड काही कमी होत नाही. (Source-people.com) मात्र थायलंडमधील सरकारने एक नवीन कायदा तयार केला असून त्यांनी तयार कायद्यानुसार तेथील माय खाओ या बीच जर कोणी सेल्फी काढताना आढळून आल्यास तर त्या व्यक्तिला मृत्युदंडाची शिक्षा केली जाऊ शकते.(Image Source-todayonline.com) कारण हा बीच फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असल्यामुळे येथून विमाने फार जवळून उडतात. अशात बीचवर फिरणारे पर्यटक फोटो काढतात किंवा सेल्फी घेतात. विमान इतक्या खालून जाते की लोकं सेल्फी घेण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात. (Image Source-shulgenko instagram) पण लोकांच्या या अशा वागण्यामुळे आणि चमकणाऱ्या फ्लॅशमुळे पायलटला अडचण होते. अनेकदा काही अपघात होता होता राहिले असल्यामुळे आता या बीचवर सेल्फी किंवा फोटो काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे.(Image Source-Logo24.pl) कोणत्याही विमानांचा मोठा अपघात होऊ नये म्हणून हा कायदा तयार करण्यात आला आहे. या कायद्यानुसार जर या नियमाचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर मृत्यूदंडाची शिक्षा देखील सुनावली जाऊ शकते(Image Source-shulgenko instagram)टॅग्स :सेल्फीथायलंडमोबाइलSelfieThailandMobile