The tallest concrete bridge tower in the world, a train and car running together
जगातला सर्वात उंच काँक्रिट ब्रिज टॉवर, एकत्र धावणार ट्रेन अन् कार By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 11:10 PM2020-01-01T23:10:42+5:302020-01-01T23:14:51+5:30Join usJoin usNext 110 मजल्यांच्या इमारतीच्या उंचीचा काँक्रिट ब्रिज पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. चीननं आज हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला केला आहे. दक्षिण-पश्चिम चीनच्या गियाझोऊ प्रांतातल्या पिंगटांग आणि लुओडियान पर्वतांना जोडण्यासाठी जगातला सर्वात उंच पिगटांग काँक्रिट टॉवर ब्रिज तयार करण्यात आला आहे. पर्वतांमध्ये उभा असलेल्या या पुलाचा नजारा एखाद्या झोपाळ्यासारखाच भासतो. या ब्रिजला तीन टॉवर आहेत. प्रत्येक टॉवरची उंची वेगवेगळी आहे. 2135 मीटर लांबीचा हा ब्रिज मंगळवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तसेच या ब्रिजशी जोडलेल्या 93 किमी लांबीच्या पिंगटांग-लुओडियान एक्स्प्रेस वेचंसुद्धा उद्घाटन करण्यात आलं आहे. एक्स्प्रेस वे आणि ब्रिज बनल्यामुळे दोन्ही भागातलं अंतर एका तासात कापणं शक्य होणार आहे. पहिल्यांचा या प्रवासासाठी साडेतीन तास लागत होते. . गियाझोऊ प्रांतात मोठ्या प्रमाणात विकासाची कामं होत आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांना अशा पुलांचा खूपच फायदा होतो आहे.