इंडोनेशियातल्या समुद्राच्या मधोमध असलेलं हे मंदिर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 10:45 PM2018-02-25T22:45:09+5:302018-02-25T22:45:09+5:30

जगभरात अनेक मंदिरं आहेत, परंतु सध्या इंडोनेशियातलं एक मंदिर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतंय.

इंडोनेशिया देशातल्या बालीमध्ये समुद्राच्या मधोमध हे मंदिर स्थित आहे. समुद्रात असलेल्या 7 मंदिरांपैकी हे एक पर्यटकांचं लक्ष वेधून घेत असतं.

बालीमधल्या दक्षिण पश्चिम तटावर हे मंदिर वसलेलं आहे. 15व्या शतकापासून आपलं अस्तित्व टिकवून असलेलं हे मंदिर पर्यटकांना आकर्षून घेतं.

समुद्रातील एका मोठाल्या खडकावर असलेल्या मंदिरांत भाविकांची रिघ असते. एका पुजा-यानं मच्छीमारांच्या मदतीनं या मंदिराची उभारणी केली होती.

बालीतल्या समुद्र देवाला वाहून घेतलेलं हे मंदिर बालीच्या पौराणिक संस्कृतीचं एक अभिन्न अंग आहे.