एक, दोन नव्हे; 'या' देशात ७ दिवसांत तब्बल १० हजार वेळा भूकंपाचे धक्के! By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 03:04 PM 2021-03-03T15:04:35+5:30 2021-03-03T15:10:20+5:30
भूकंपाचा एक धक्का देखील विद्ध्वंसासाठी पुरेसा ठरतो. पण एका आठवड्यात तब्बल १० हजार वेळा भूकंपाचे धक्के बसलेला देश या जगात आहे. जाणून घेऊयात या देशाबद्दल... उत्तर अटलांटीकमधील आइसलँड देशात गेल्या आठवड्याभरापासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. हे धक्के अजूनही अधूनमधून बसत आहेत.
आइसलँडमधील भूकंपाची तीव्रता ५.७ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ आइसलँडमधील प्राध्यापक बेनेडिक्ट होल्डरसेन यांच्या माहितीनुसार गेल्या आठवड्याभरापासून आइसलँडमध्ये भूकंपाचे धक्के बसत आहेत.
भूकंप जणू आता तिथलं दैनंदिन दिनक्रम झाल्यासारखं झालं आहे. लोकांनाही भूकंपाच्या धक्क्यांची सवय झाली आहे. त्यासाठीची पूर्वतयारीच लोक घरात करुन ठेवत आहेत.
भूकंपाची चाहूल लागली की लोक घरात खुर्ची आणि बेडखाली डोक्यावर हात घेऊन दडून बसतात.
भूकंपाचा एक धक्का देखील मोठा विद्ध्वंस घडवू शकतो. पण आइसलँडमध्ये रोजचे भूकंपाचे छोटे धक्के आता दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत.
भूकंप हा आता आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळे या परिस्थितीत जगताना सर्व गोष्टींसाठी आपण तयार राहायला हवं, असं प्राध्यापक बेनेडिक्ट यांनी सांगितलं.