Mahlagha Jaberi: इराणची ऐश्वर्या रॉय म्हणून ओळखली जाते ही अभिनेत्री, ग्लॅमरस फोटोंनी इंटरनेटवर लावलीय आग By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 02:28 PM 2022-09-22T14:28:10+5:30 2022-09-22T14:30:49+5:30
Mahlagha Jaberi: हिजाब व्यवस्थित परिधान न केल्याने महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीला अटक केल्यानंतर तिच्या तुरुंगात झालेल्या मृत्यूमुळे सध्या इराणमध्ये व्यापक आंदोलन पेटले आहे. अनेक प्रख्यात महिला या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. ३२ वर्षीय अभिनेत्री महलाघा जबेरी हिनेनी या घटनेचा निषेध केला आहे. महलाघा जबेरी ही इराणची ऐश्वर्या रॉय म्हणून ओळखली जाते. आज जाणून घेऊयात तिच्याविषयी. हिजाब व्यवस्थित परिधान न केल्याने महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीला अटक केल्यानंतर तिच्या तुरुंगात झालेल्या मृत्यूमुळे सध्या इराणमध्ये व्यापक आंदोलन पेटले आहे. अनेक प्रख्यात महिला या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. ३२ वर्षीय अभिनेत्री महलाघा जबेरी हिनेनी या घटनेचा निषेध केला आहे. महलाघा जबेरी ही इराणची ऐश्वर्या रॉय म्हणून ओळखली जाते. आज जाणून घेऊयात तिच्याविषयी.
महलाघा ही तिच्या ग्लॅमरसर लूकसाठी ओळखली जाते. महलाघाची उंची, डोळे आणि केस हे बऱ्यापैकी ऐश्वर्या रॉयसारखे आहेत. तिच्या फोटोंमध्ये ऐश्वर्याची झलक दिसते. इन्स्टाग्रामवर त्यांचे चाल दशलक्षहून अधिक फॉलोअर आहेत. ती सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करून आपल्याबाबत माहिती देत असते.
महलाघा २०२१ आणि २०२२मध्ये कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला होता. महलाघा २०१९ मध्ये भारतात आली होती. तिने ट्रेडिशनल लूकमधील पोटोमध्ये तिच्या पोस्टवर हॅलो फ्रॉम इंडिया असं लिहिलं होतं.
महलाघाचा जन्म इराणमधील इस्फहान शहरात झाला होता. हे शहर पर्शियन स्थापत्यकलेसाठी ओळखले जाते. मॉडेलिंगमधील करिअरसाठी अमेरिकेत शिफ्ट झाली आहे. ती ट्विटरवरदेखील सक्रिय असते. तसेच ती इराणच्या राजकारणाबाबत आपली मतं ठामपणे मांडत असते.
मॉडेलिंगशिवाय महालघाला हिला फावल्या वेळी घोडेस्वारी आणि शॉपिंग करण्याचा छंद आहे. चित्रपटांबाबतही तिला विशेष आवड आहे. तसेच ती इंग्रजी रोमँटिक आणि सायन्स फिक्शन पाहणे पसंत करते.