व्हाईट हाऊसमधील भाषणात मोदींना आठवले 'ते' दिवस, ३० वर्षांपूर्वीचा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 10:02 PM 2023-06-22T22:02:45+5:30 2023-06-22T22:15:51+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. यापूर्वीत ते अमेरिकेत गेले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. यापूर्वीत ते अमेरिकेत गेले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.
मोदींच्या दुसऱ्या अधिकृत दौऱ्यावेळी जो बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे. बायडन यांनी मोदींना विशेष निमंत्रण दिले होते. त्यामुळे, व्हाईट हाऊसमध्ये मोदींचे स्वागतही तितक्यात खास पद्धतीने झाले.
मोदींनी व्हाईट हाऊसमध्ये पाऊल ठेवल्यानंतर त्यांना ३० वर्षांपूर्वीचे जुने दिवस आठवले. जेव्हा मोदींनी व्हाईट हाऊसबाहेर उभे राहून फोटो काढला होता. तेव्हा ते भाजपचे प्रचारक होते.
व्हाईट हाऊसमध्ये भाषण करताना मोदींनी म्हटले की, मी सर्वात आधी राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी केलेल्या स्वागतासाठी मनापासून धन्यवाद देतो. आज व्हाईट हाऊसमध्ये जबरदस्त स्वागत केले हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान आहे.
त्या सन्मानासाठी मी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि जिल बायडन यांचे आभार मानतो. ३ दशकापूर्वी सर्वसामान्य नागरिक म्हणून US ला आलो होतो, तेव्हा व्हाईट हाऊस केवळ बाहेरून पाहता आले.
यावेळी पहिल्यांदाच व्हाईट हाऊसचे दरवाजे इतक्या मोठ्या संख्येने भारतीय अमेरिकनसाठी उघडण्यात आले अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरुवात करत मने जिंकली.
अमेरिकेच्या दौऱ्यावर असणारे पंतप्रधान आज वॉश्गिंटन डीसीत होते. मोदींच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसला पोहचले. याठिकाणी मोदींचे भव्यदिव्य स्वागत झाले.
व्हाईट हाऊसमध्ये मोदी आणि बायडन प्रशासन यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. पंतप्रधान मोदींचे बायडन दाम्पत्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी व्हाईट हाऊसमध्ये संगीत समारंभही आयोजित करण्यात आला होता.
नरेंद्र मोदी हे १९९३ साली अमेरिकेत फिरण्यासाठी आले होते. मोदींनी त्यांच्या याच अमेरिकेतील पर्यटन प्रवासाची आठवण सांगितली. तसेच, पंतप्रधान झाल्यानंतर अनेकदा आपण व्हाईट हाऊसला आल्याचेही त्यांनी म्हटले.
मोदी आपल्या मित्रांसमवेत व्हाईट हाऊसच्या बॉर्डरवर होते. त्यावेळी, मित्रांसमवेत मोदींनी फोटोही काढला होता. तो फोटो पंतप्रधा नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर व्हायरल झाला होता.