इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती? By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 09:03 AM 2024-10-03T09:03:19+5:30 2024-10-03T09:15:52+5:30
इस्त्रायल आणि इराणमध्ये तणाव वाढला आहे. या दोन्ही देशांची लष्करी ताकद मोठी आहे. इस्त्रायल आणि इराणमधील तणाव आणखी वाढला आहे. काल इराणने इस्त्रायलवर हल्ला केला. इस्रायल आणि इराणमधील हवाई अंतर १७०० किलोमीटर आहे.
लंडन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजचे संरक्षण तज्ञ फॅबियन हिन्झ यांच्या मते, इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही. इराणने ज्या प्रकारे आधुनिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे, यावरुन त्यांच्याकडे आधुनिक क्षेपणास्त्रे असल्याचे दिसत आहे. यामुळे इराण इस्रायलला कडवी टक्कर देईल.
इराणकडे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन आहेत जे युद्ध झाल्यास इस्रायलशी सामना करण्यासाठी तयार आहेत. इराणने इस्रायलला डोळ्यासमोर ठेवून शस्त्रे बनवली आहेत.
याशिवाय क्षेपणास्त्र हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इराणकडे १५ हजार हवाई संरक्षण यंत्रणा आहेत. इराणने एरो-3 प्रणालीने आपली सीमा अभेद्य ठेवली आहे. इस्रायल आधुनिक आयर्न डोम प्रणालीने सुसज्ज आहे.
९० टक्के क्षेपणास्त्र हल्ले निष्फळ करू शकते, असा दावा इस्त्रायलचा आहे. रडारच्या मदतीने शत्रूच्या क्षेपणास्त्राचा शोध घेतल्यानंतर ते निष्क्रिय करते. ही यंत्रणा क्षेपणास्त्र रोखण्यासाठी एकाच वेळी २० हून अधिक हल्ले करते.
इस्रायल त्यांच्या लष्करी ताकदीसाठी ओळखला जातो. इस्रायलचे संरक्षण बजेट ३०.५ अब्ज डॉलर आहे. त्यांच्याकडे १६९५०० सैनिक आहेत. याशिवाय आपत्कालीन आणि युद्धाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ४६५ हजार राखीव सैनिक आहेत.
इस्रायलची हवाई शक्ती- फायटर जेट 339, FI-16 196, F-15 83, F-35 30, हेलिकॉप्टर 142, अपाचे हेलिकॉप्टर 43
जमिनीवरील शक्ती- टँक- 200, तोफ -530, नौदल शक्ती- युद्धनौकेची देखरेख यंत्रणा- ४९, पाणबुडी-5
इराणचेही इस्रायलच्या तुलनेत त्याचे संरक्षण बजेट ६.८५ अब्ज डॉलर आहे. मात्र, सैन्याच्या संख्येत इस्रायल इस्त्रायलपेक्षा खूप पुढे आहे. इराणमध्ये एकूण ६१०००० सैनिक आहेत. त्यात १९०००० राखीव सैनिक आहेत.
इराणची हवाई शक्ती- फायटर जेट 551, 3500 क्षेपणास्त्रे, रशियाकडून S-300 क्षेपणास्त्र खरेदी केले आहे.
सैन्य शक्ती- टँक 1500, तोफ 253, ड्रोन 1800, नौदल शक्ती 19-27 पाणबुडी, 32 युद्धनौका, 350 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे