इंट्रेस्टिंग आहे ट्रम्प यांच्या ग्लॅमरस ऑफिसरची लव्ह स्टोरी, स्वतः 27 ची, तर पती 60 वर्षांचा..., लपवून ठेवलंय एक खास रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:36 IST2025-01-31T13:27:03+5:302025-01-31T13:36:12+5:30
लॅविट ही ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात व्हाइट हाऊस प्रेस ऑफिसमध्ये इंटर्न म्हणून काम करत होती...

अमेरिकेत ट्रम्प यांचे सरकार आल्यापासून रोजच्या रोज नव-नव्या घोषणा होताना दिसत आहेत. यातच ट्रम्प यांची एक तरुण आणि ग्लॅमरस प्रेस सेक्रेटरी कॅरोलीना लॅव्हिटही जबरदस्त चर्चेत आहेत.
कॅरोलीना लॅव्हिटने आपल्यापेक्षा तब्बल 33 वर्षांनी मोठ्या असलेल्या एका बड्या उद्योगपतीशी लग्न केले आहे. महत्वाचे म्हणजे, कॅरोलीना लॅव्हिट, ही अमेरिकेतील आतापर्यंतची सर्वात तरूण प्रेस सेक्रेटरी आहे. ती केवळ 27 वर्षांची आहे. याशिवाय ती तिच्या वैयक्तील जीवनांसदर्भातही चर्चेत आहे.
लॅव्हिट ही ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात व्हाइट हाऊस प्रेस ऑफिसमध्ये इंटर्न म्हणून काम करत होती. यानंतर ती कॅलिघ मॅकइनॅनीची असिस्टेंट प्रेस सचिव झाली. यानंतर 2021 मध्ये तिने 'रिपब्लिकन एलिस स्टिफनिक'साठी काम केले.
2022 मध्ये तिने काँग्रेससाठी न्यू हॅम्पशायरमधून निवडणूकही लढली होती. मात्र ती यशस्वी होऊ शकली नव्हती. यानंतर तिने 2024 मध्ये ट्रम्प यांच्यासाठी प्रचार केला. ती ट्रम्प यांच्या प्रचार अभियानची वरिष्ठ सचिवही झाली. ट्रम्प यांनी स्वतःदेखील कॅरोलीनाचे कौतुक केले आहे.
इंट्रेस्टिंग आहे लॅव्हिटची लव्ह स्टोरी - लॅव्हिटचा करियर ग्राफ अत्यंत वेगाने वर गेला आहे. याच काळात तिची ओळख अमेरिकेतील एक मोठे उद्योगपती निकोलस रिकियो यांच्याशी झाली. यानंतर दोघांचे डेटिंग सुरू झाले आणि नंतर त्यांनी लग्नही केले.
३३ वर्षांनी मोठा आहे पती - लॅव्हिट पती निकोलस रिकियो हे 60 वर्षांनी मोठे आहेत. तर लॅव्हिड स्वतः 27 वर्षांची आहे. तिने तिच्या पेक्षा ३३ वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीसोबत लग्न करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
लॅव्हिटच्या लव्ह स्टोरीची आणि लग्नाची एक इंट्रेस्टिंग गोष्ट म्हणजे, तिने 2023 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी आपल्या लग्नाच्या रिंगचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता आणि हे माझ्या जीवनातील सर्वात मोठे ख्रिसमस गिफ् आहे. मी माझ्या स्वप्नातील व्यक्तीसोबत लग्न करत आहे. देवा धन्यवाद...!''
कधीच जाहीर केली नाही लग्नाची तारीख - यानंतर, लॅव्हिट जुलै 2024 मध्ये एका मुलाची आईही झाली. यासंदर्भातील फोटोही तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र तिने आपल्या लग्नाची तारीख अथवा फोटो आणखी एकदाही शेअर केलेला नाही.