पाकिस्तानातील सर्वात महागडा पॅलेस, किंमत ऐकून तुम्ही म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 12:55 PM2024-12-02T12:55:23+5:302024-12-02T13:09:52+5:30

Pakistan Costliest House : पाकिस्तानमधील सर्वात महागडे घर कोणते? त्याची किंमत किती? याबद्दल जाणून घ्या...

पाकिस्तानमधील अर्थव्यवस्था सध्या कोलमडली आहे. देशातील अनेकजण गरिबीशी झुंजत आहेत. मात्र येथील राजकीय नेते, लष्करातील अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्ती ऐषोआरामात आपले जीवन जगत आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानमधील सर्वात महागडे घर कोणते? त्याची किंमत किती? याबद्दल जाणून घ्या...

इस्लामाबादच्या गुलबर्ग भागात पाकिस्तानातील सर्वात महागडे घर किंवा पॅलेस आहे. हा पॅलेस अतिशय सुंदर असून ज्या भागात आहे, त्याठिकाणी मोठे व्यापारी, खेळाडू, कलाकार इत्यादी राहतात.

१० बेडरूम्स असलेल्या या आलिशान पॅलेसमध्ये स्विमिंग पूल, जिम आणि खाजगी थिएटर यांसारख्या सुविधा आहेत. तसेच, पार्किंगसाठी मोठी जागा आहे. या पार्किंगमध्ये अनेक महागड्या गाड्या उभ्या असतात. मात्र, या घराचा मालक कोण आहे, याची माहिती इंटरनेटवर उपलब्ध नाही.

आता पाकिस्तानच्या या सर्वात महागड्या पॅलेसची किंमत समोर आली आहे. तर या पॅलेसची किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण हा पॅलेस हजार-दोन हजार कोटी रुपयांचा नाही. तर त्याची किंमत १२५ कोटी पाकिस्तानी रुपये म्हणजेच भारतीय चलनात फक्त ३८ कोटी रुपये आहे.

दरम्यान, भारतात १०० कोटींहून अधिक किमतीची हजारो घरे आहेत. दिल्ली, मुंबई, नोएडा, गुरुग्राम यांसारख्या शहरांमध्ये १०० कोटी रुपयांचे फ्लॅट आहेत. हे ऐकून तुम्ही म्हणाल की कोणताही भारतीय पाकिस्तानमध्ये सर्वात महाग घर खरेदी करू शकतो.

पाकिस्तानातील सर्वात महागडा हा पॅलेस विकल्यानंतर चर्चेत आला आहे. १२५ कोटी पाकिस्तानी रुपयांच्या किमतीने पाकिस्तानी लोकांना आश्चर्यचकित केले.हा पॅलेस येथील लक्झरी रिअल इस्टेटमध्ये एक सँडर्ड बनला आहे.

रॉयल पॅलेस हाऊस नावाचा हा पॅलेस इस्लामाबादच्या सर्वात पॉश भागात आहे, जिथे १०-१२ कोटी रुपयांच्या किमतीत लक्झरी फार्महाऊस सहज खरेदी करता येतात. साहजिकच एवढा पैसा खर्च करूनच लोक पाकिस्तानच्या श्रीमंतांच्या पंक्तीत सामील होऊ शकतात.