भारतात वाढणार जुळी, तिळी मुले हाेण्याचे प्रमाण; नेमकं कारण काय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:56 IST2025-01-31T13:51:16+5:302025-01-31T13:56:56+5:30

कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये वर्ष २०५० ते २१०० या काळात एकापेक्षा जास्त मुले जन्माला येण्याचे प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

बदललेल्या जीवनशैलीमुळे जगभरातील महिला कमी मुलांना जन्म देत आहेत. त्यामुळे जन्मदरात मोठी घट होत असली तरी जुळी मुले किंवा तीन मुले होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.

जुळी मुले जन्माला येण्याचे प्रमाण वाढत असल्याचा दावा ब्रिटनमधील एका अभ्यासात केला आहे.

वाढत्या वयात गर्भधारणा तसेच प्रजनन उपचारांचा वाढता वापर यासारखे सामाजिक घटक जुळी मुले जन्माला येण्याचे प्रमुख कारण आहे.

एकाच वेळी एकापेक्षा जास्त मुले जन्माला येणे ही सामान्य बाब नाही. प्रत्येक ६० गर्भधारणांपैकी एक गर्भधारणेत अनेक मुले जन्माला येतात.

१९४० ते १९६०च्या दशकांत बाळांना जन्म देण्याचे प्रमाण वाढलेले असताना इंग्लंड व वेल्समध्ये एकपेक्षा अधिक मुलांना जन्म देण्याचे प्रमाण एक हजार गर्भधारणांत जवळपास १२ ते १३ होते.

१९५० च्या काळात महिला सरासरी २६ व्या वर्षी बाळाला जन्म देत असल्याने त्या वेळी एकापेक्षा जास्त मुलांना जन्म देण्याचे प्रमाण अत्यल्प होते. 

२०२३ साली इंग्लंड अँड वेल्सने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या २००० पैकी एका महिलेला जुळे किंवा त्यापेक्षा अधिक मुले होतात. मात्र, ३५ ते ३९ या वयोगटातील महिलांना दोन किंवा तीन मुले होण्याचे हे प्रमाण ५७ पैकी एक आहे. 

कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये वर्ष २०५० ते २१०० या काळात एकापेक्षा जास्त मुले जन्माला येण्याचे प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

या कारणामुळे जुळी मुले जन्मतात- जेव्हा दोन वेगवेगळी अंडी एकाच वेळी फलित झाली असतील किंवा फलित झालेली अंडी जर दोन भागांत विभागली गेली, तर ‘हायपर-ओव्हुलेशन’ होते. त्यामुळे एकापेक्षा अधिक मुले जन्माला येतात.

कधी कधी तर दुर्मिळ ‘हायपर-ओव्हुलेशन’ म्हणजेच ‘हायपर-ऑर्डर मल्टीपल प्रेगनेन्सीज’मुळे तीन ते नऊ मुलांना जन्म देऊ शकते.

टॅग्स :महिलाWomen