जगातील सर्वात श्रीमंत गाव, शेतीमधून प्रत्येक व्यक्ती दरवर्षी कमावते ८० लाख रुपये, जगतात आलिशान जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 11:16 PM2022-06-04T23:16:34+5:302022-06-04T23:18:49+5:30

World Richest Village: जर तुम्हाला कुणी सांगितले की. जगामध्ये असाही एक गाव आहे, ज्याच्यासमोर अनेक मोठी शहरंही टिकत नाही, तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. मात्र हे खरं आहे. या गावाच्या संपन्नतेचा अंदाज हा येथील आलिशान जीवनशैलीवरून येऊ शकतो. येथील प्रत्येक व्यक्ती लक्झरी गाडीतून प्रवास करते. तर आलिशान घरात राहतात.

जर तुम्हाला कुणी सांगितले की. जगामध्ये असाही एक गाव आहे, ज्याच्यासमोर अनेक मोठी शहरंही टिकत नाही, तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. मात्र हे खरं आहे. या गावाच्या संपन्नतेचा अंदाज हा येथील आलिशान जीवनशैलीवरून येऊ शकतो. येथील प्रत्येक व्यक्ती लक्झरी गाडीतून प्रवास करते. तर आलिशान घरात राहतात.

आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाबद्दल सांगणार आहोत. जे अनेक शहरांना टक्कर देणारे आहे. येथील प्रत्येक व्यक्ती कोट्यधीश आहे. त्यामुळे या गावाला जगातील सर्वात श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाते.

चीनमधील जियांगयिन शहराजवळ हुआझी नावाचा एक गाव वसलेला आहे. हा कृषिप्रधान गाव आहे. येथील बहुतांश लोक शेती करतात. हुआझी गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वार्षिक कमाई ही ८० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

या गावातील सर्वांनी आलिशान घरं बांधली आहे. त्यामध्ये आरामाची प्रत्येक सुविधा आहे. घरामध्ये लक्झरी कारसुद्धा आहेत. येथील रस्ते या गावाला शहराचा लूक देतात.

हा गाव १९६१ मध्ये वसवण्यात आला होता. तेव्हा येथे मोठ्या प्रमाणावर गरिबी होती. गाव वसल्यानंतर सुमारे एक वर्षानंतर येथे कम्युनिस्ट पार्टी संघटनेची स्थापना झाली. त्याचे अध्यक्ष वू रेनवाओ यांनी एक अशी कल्पना ग्रामस्थांना दिली. ज्यामुळे येथे क्रांतिकारी बदल झाला.

त्यांनी लोकांना व्यक्तिगत शेतीऐवजी समूह शेती करण्याचा सल्ला दिला. लोकांनी त्यांचं म्हणणं ऐकलं आणि सामुहिक शेती सुरू केली. त्यानंतर सर्व काही बदलू लागलं आणि आज येथील प्रत्येक व्यक्ती करोडपती बनली आहे.