उत्तर कोरिया, तालिबानपेक्षाही अजब आणि कठोर आहेत या देशातील नियम, वाचून तुम्ही म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:14 IST2025-01-30T11:09:50+5:302025-01-30T11:14:54+5:30

Turkmenistan Rules: हुकूमशाहांची सत्ता असलेल्या जगातील अनेक देशांतील नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये अनेक कठोर नियमांचं पालन करावं लागतं. यापैकी एखादा नियम मोडल्यास त्यांना तेवढीच कठोर शिक्षाही केली जाते. अशा देशांचा उल्लेख आल्यावर उत्तर कोरिया, अफगाणिस्तान, चीन आदी देशांची नावं आपल्या समोर येतात. अशाच देशांपैकी आणखी एक देश आहे तो म्हणजे तुर्कमेनिस्तान. या देशातील नियमही तितकेच अजब आणि कठोर आहेत.

हुकूमशाहांची सत्ता असलेल्या जगातील अनेक देशांतील नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये अनेक कठोर नियमांचं पालन करावं लागतं. यापैकी एखादा नियम मोडल्यास त्यांना तेवढीच कठोर शिक्षाही केली जाते. अशा देशांचा उल्लेख आल्यावर उत्तर कोरिया, अफगाणिस्तान, चीन आदी देशांची नावं आपल्या समोर येतात. अशाच देशांपैकी आणखी एक देश आहे तो म्हणजे तुर्कमेनिस्तान. या देशातील नियमही तितकेच अजब आणि कठोर आहेत.

तुर्कमेनिस्तानमधील काही नियम आणि कायदे एवढे कठोर आहेत की ज्यामुळे तिथे राहणं हे एक मोठं आव्हानच आहे. येथे महिलांवर एवढे निर्बंध आहेत, ज्याबाबत ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल. तसेच पुरुषांनाही अनेक चित्रविचित्र नियमांचं पालन करावं लागतं.

मध्य आशियातील तुर्कमेनिस्तान हा पूर्णपणे भूवेष्टित देश आहे. या देशाच्या कुठल्याही सीमेवर समुद्र नाही. या देशामधील लोकांनाही विविध कठोर कायद्यांनी जखडलेले आहे.

तुर्कमेनिस्तानमध्ये महिलांसाठीचे नियम बरेच कठोर आहेत. येथील महिलांना साज-शृंगार करण्याची परवानगी नाही आहे. महिलांना आयब्रो करण्याची, नेल एक्स्टेंशन करण्याची, तसेच टॅटू काढण्याची, केस रंगवण्याची परवानगी नाही. ही सर्व कामं या देशामध्ये बेकायदेशीर मानली जातात. त्यामुळे येथे ब्युटी पार्लर केवळ नावालाच आहेत. जर कुठल्याही महिनेने ब्युटी ट्रिटमेंट घेतली तर त्यांना तुरुंगवास होऊ शकतो.

तसेच तुर्कमेनिस्तानमध्ये महिलांना वाहन चालवण्याची परवानही नाही. एवढंच नाही तर त्यांना कारच्या पुढच्या सिटवर बसण्यास देखील मनाई आहे. येथील महिला त्यांच्या कुटुंबीयांसोबतच कारमधून फिरू शकतात. एकटी महिला जर कारमधून कुठल्या नातेवाईकासोबत जात असेल तक तिला तिची ओळख पटवून संबंधित व्यक्ती तिची नातेवाईक आहे हे सिद्ध करावं लागतं. तसेच सोबत पुरुष नातेवाईक असल्याशिवाय महिलांना टॅक्सीमध्ये बसण्याचीही परवानगी नाही. अशा परिस्थितीत त्यांना पायी प्रवास करावा लागतो.

तुर्कमेनिस्तानमध्ये महिलांना पुरुषांसोबत कुठेही एकत्रित काम करण्याची परवानगी नाही. महिला केवळ त्यांच्या गटांमधून काम करू शकतात.

केवळ महिलाच नाही तर पुरुषांनाही येथे काही अजब नियमांचं पालन करावं लागतं. येथे तरुण मुलांना दाढी राखण्याची परवानगी नाही. तसेच ७० वर्षांवरील वृद्ध पुरुषांनाही दाढी राखण्याची परवानगी नाही.

एवढंच नाही तर तुर्कमेनिस्तानच्या राजधानीमध्ये काळ्या रंगाची कार वापरण्याच मनाई आहे. तसेच कार मळलेली असता कामा नये, असाही दंडक आहे. असं घडल्यास कठोर दंडात्मक कारवाई केली जाते. एवढंच नाही तर एकदा कुत्र्यांवरही येथे बंदी घालण्यात आली होती.