येथे कबुतरांना दाणे घालण्यावर आहे बंदी By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 10:36 PM 2019-11-08T22:36:24+5:30 2019-11-08T23:01:22+5:30
कबुतरांना आणि इतर पक्षांना दाणे टाकणे ही बाबा काही लोक पुण्याची बाब समजतात. पण या जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कबुतरांना दाणे घालण्यावर बंदी आहे.
व्हेनिस इटलीमधील व्हेनिस शहरामध्ये २००८ पासून कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी लागू करण्यात आलेली आहे.
बोगोटा दक्षिण अमेरिकेमधील कोलंबियाची राजधानी असलेल्या बोगोटा शहरामध्ये कबुतरांना खाणे देण्यास मनाई करण्यास आलेली आहे.
बँकॉक थायलंडमधील बँकॉक शहरात प्रशासनाकडून कबुतरांना पकडून जंगलात रवानगी करत आहेत. कबुरतांमुळे उदभवणाऱ्या विविध आजारांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
वॉटरलूविले ब्रिटनमधील वॉटरलूविले शहरात कबुतरांना दाणे टाकल्यास त्यांना ८० पौंडांचा दंड ठोठावण्यात येतो.
हैदराबाद हैदराबाद शहरसुद्धा कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे त्रस्त आहे. त्यामुळे २०१७ पासून येथे कबुतरांना दाणे देण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
पुणे पुण्यामध्येसुद्धा कबुतरांमुळे गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे कबुतरांना दाणे घालू नका, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लास वेगास अमेरिकेतील लास वेगास शहरातील प्रशासनाकडूनसुद्धा कबुतरांव बंदी घालण्याबाबत विचार सुरू आहे.