These are the 10 largest rivers in the world
या आहेत जगातल्या 10 सर्वात मोठ्या नद्या By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 04:33 PM2019-11-28T16:33:06+5:302019-11-28T16:41:28+5:30Join usJoin usNext नाइल नदी (आफ्रिका) - गंगा ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण जगातल्या सर्वात मोठ्या 10 नद्यांमध्ये भारतातल्या गंगेचा समावेश नाही. पूर्व आफ्रिकेत वाहणारी नाईल नदी जगातील सर्वात लांब नदी आहे. या नदीची लांबी 6650 किलोमीटर म्हणजेच 4132 मैल आहे. या नदीच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत इजिप्त आणि सूडानमध्ये आहे. अॅमेझॉन नदी (दक्षिण अमेरिका)- अॅमेझॉन ही जगातली दुसरी सर्वात लांब असलेली नदी आहे. या नदीची लांबी 6400 किलोमीटर आहे. जी नील नदीहून थोडीशी छोटी आहे. जगात ही नदी दुसऱ्या नंबरवर असली तरी पाण्याच्या घनतेच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. यांग्त्झी नदी (चीन)- चीनमधून वाहणारी नदी ही आशियातील सर्वात मोठी नदी आहे. तसेच जगातील ही तिसऱ्या क्रमांकाची नदी आहे. या नदीची लांबी 6300 किलोमीटर एवढी आहे. चीन सरकारनं दोन भागांना जोडण्यासाठी या नदीच्या आर-पार मेट्रो लाइनचं जाळं टाकलं आहे. या नदीला चीनमध्ये चांग झियांगही म्हटलं जातं. मिसिसिपी नदी (अमेरिका)-लांबीच्या बाबतीत ही अमेरिकेतली सर्वात मोठी नदी आहे. तसेच जगातील चौथ्या नंबरदी नदी आहे. या नदीची लांबी 6275 किलोमीटर एवढी आहे. ही नदी पूर्णतः अमेरिकेतून वाहते. मिसिसिपी उपनदी मिसोरी आहे, तर मिसोरीची उपनदी जेफरसन आहे. मिसिसिपी नदीचं स्रोत इटास्काच्या तलावाला मानलं जातं. येनिस नदी (रशिया)-रशिया आणि मंगोलियामध्ये वाहणारी ही नदी आहे. जगातली सर्वात मोठी ही पाचवी मोठी नदी आहे. या नदीची लांबी 5539 किलोमीटर एवढी आहे. येनिस ही तीन नद्यांच्या संगमानं तयार होते. अंगारा, सेलेंगा आणि येनिस या नद्यांच्या मीलनानं येनिस नदी तयार होते. ही नदीचा उगम मंगोलियातल्या मध्य भागातून होतो. येल्लो नदी (चीन)- चीनमध्ये वाहणारी ही नदी हुआंग नदीच्या नावानंसुद्धा ओळखली जाते. या नदीची लांबी 5464 किलोमीटर एवढी आहे. ही चीनमधली दुसरी सर्वात मोठी नदी आहे. या नदीला चिनी सभ्यतांचं उगमस्थान असल्याचंही म्हटलं जातं. भारताच्या आसाममधून वाहत जात ही नदी तिबेट, चीन आणि बांगलादेशमध्ये वाहते. ओब नदी (रशिया) - ही नदी रशिया आणि पश्चिमी सायबेरिया क्षेत्रात वाहते. या नदीची लांबी 5410 किमी आहे. ओब नदीच्या पाण्याचा वापर सिंचन, वीज, मच्छीमारी आणि पेयजल योजनांसाठी केला जातो. ओब नदी बियान आणि कुतुन नदीच्या संगमानं तयार होते. पराना नदी (दक्षिण अमेरिका)- दक्षिण अमेरिकेत वाहणारी नदी मुख्य स्वरूपात नौकायानासाठी ओळखली जाते. दक्षिण अमेरिकेत वाहणाऱ्या नद्यांमध्ये अॅमेझॉन नदीनंतर ही दुसरी सर्वात मोठी नदी आहे. पराना नदीचा अर्थ समुद्रासारखी विशाल असा आहे. ब्राझील, पॅराग्वे आणि अर्जेंटिनामधून ही नदी वाहते. कांगो नदी (आफ्रिका)- आफ्रिका महाद्विपातल्या या नदीला जेयरे नदीसुद्धा संबोधलं जातं. नील नदीनंतर ही ऑफ्रिकेतली सर्वात लांब नदी आहे. कांगो नदी 4700 किमीपर्यंतचा प्रवास करते. ही 230 मीटरसह जगातील सर्वात खोल नदी आहे. अमूर नदी(रशिया)- अमूर-अर्गुन ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे. यांची लांबी 4444 किलोमीटर आहे. या नदीला चिनी भाषेत हेईलाँग झियांग म्हणजेच ब्लॅक ड्रॅगन नदीसुद्धा म्हटलं जातं. 17व्या शतकापासून 20व्या शतकापर्यंत रशिया आणि चीनमध्ये जमिनीवरून वाद झाले. यात अमूर नदीनं निर्णायक भूमिका बजावलेली होती.