These are the amazing waterfalls in the world
हे आहेत जगातील विस्मयकारक धबधबे By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 11:03 PM2018-07-05T23:03:23+5:302018-07-05T23:13:18+5:30Join usJoin usNext ग्रँड मेरिस येथील डेव्हिल्स केटल धबधब्याचे दोन प्रवाह असून, त्यातील एक प्रवाह नदीमध्ये पडतो, तर दुसरा प्रवाह डोंगरातील एका गुहेमध्ये विलुप्त होतो. कॅनडामधील कॅमरॉन धबधबाही असाच वैशिष्ट्यपूर्ण असून, जून महिन्यामध्ये त्याचा रंग गुलाबी होतो. कॅलिफोर्नियातील हॉर्सटेल धबधब्याचा रंग फेब्रुवारी महिन्यामध्ये बदलून लाल होतो. त्यामुळे येथून पाणी नाही तर आगीच्या ज्वाला निघत असल्याचे पाहणाऱ्यास वाटते. तुर्कस्तानमधील पमुकुले धबधबाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याची विशिष्ट्यपूर्ण रचना आणि दुधाळ पाण्यामुळे येथे कापसाचा महाल उभा केल्याचा भास होतो. टॅग्स :निसर्गबातम्याNaturenews