These are the most dense forests
हे आहेत सर्वाधिक घनदाट जंगले असलेले आघाडीचे दहा देश By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 04:30 PM2019-07-01T16:30:59+5:302019-07-01T16:58:15+5:30Join usJoin usNext हिरवळीने नटलेली जंगले ही पर्यावरणाचे पंचप्राण असतात. ज्या भागात जंगलांची दाटी असते तिथे प्रदूषणाचे प्रमाण कमी असते. आज आपण पाहूया सर्वाधिक घनदाट जंगले असलेले जगातील आघाडीचे दहा देश. 10) भारत सर्वाधिक घनदाट जंगले असलेल्या पहिल्या दहा देशांच्या यादीत आपला भारत देश दहाव्या स्थानी आहे. भारतात सुमारे 8 लाख 02 हजार 088 चौकिमी प्रदेश वनाच्छादित आहे. देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 23.68 टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे. 9) इंडोनेशिया अनेक बेटांनी बनलेला इंडोनेशिया हा देश वनसंपत्तीने समृद्ध आहे. येथील 8 लाख 84 हजार 950 चौकिमी क्षेत्र वनाच्छादित आहे. इंडोनेशियाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 46.46% क्षेत्र वनांनी व्यापलेले आहे. 8) अर्जेंटिना दक्षिण अमेरिकेमधील अर्जेंटिना या देशातील एकूण 9 लाख 45 हजार 336 क्षेत्र वनांनी आच्छादलेले आहे. हे क्षेत्र देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 34% एवढे आहे. 7) डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो आफ्रिका खंडातील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो या देशातील एकूण 11 लाख 72 हजार 704 चौकिमी क्षेत्र वनाच्छादित आहे. 6) ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामधील 14 लाख 70 हजार 832 चौकिमी क्षेत्र वनांनी आच्छादलेले आहे. 5) चीन जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असा लौकिक असलेल्या चीनमध्येही मोठे क्षेत्र वनाच्छादित आहे. चीनमधील 20 लाख 83 हजार 210 चौकिमी क्षेत्र वनाच्छादित आहे. 4) अमेरिका अमेरिकेमधील मोठे क्षेत्र वनांनी आच्छादलेले आहे. अमेरिकेच्या एकूण भूभागापैकी 32 लाख 00,950 चौकिमी क्षेत्रावर वने आहेत. 3) ब्राझील अॅमेझॉनच्या दुर्गम परिसरासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्राझीलमध्ये एकूण 49 लाख 16 हजार 438 चौकिमी क्षेत्र वनाच्छादित आहे. 2) कॅनडा कॅनडा हा देश वन्यसंपत्तीने समृद्ध असून येथील 49 लाख 16 हजार 438 चौकिमी क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. 1) रशिया क्षेत्रपफाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश असलेल्या रशियाकडे जगातील सर्वाधिक वनसंपदा आहे. रशियाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 81 लाख 49 हजार 300 चौकिमी क्षेत्र वनाच्छादित आहे. टॅग्स :जंगलपर्यावरणभारतट्रॅव्हल टिप्सपर्यटनforestenvironmentIndiaTravel Tipstourism