या आहेत जगातील सर्वात दुर्गम जागा, कुणी करू शकत नाही इथे जाण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 05:22 PM2020-02-20T17:22:57+5:302020-02-20T17:42:52+5:30

आपली पृथ्वी विविध भूरूपांनी नटलेली आहे. इथे उंच पर्वतरांगा, विस्तीर्ण मैदाने, समुद्र किनारे, वाळवंट, दऱ्याखोऱ्या असे सारे काही आहे. आज पृथ्वीवरील बहुतांश भागात मानवाने वस्ती केली आहे. मात्र आजही या जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे जाताना माणूस अनेकवेळा विचार करतो. आज जाणून घेऊयात अशाच काही दुर्गम जागांविषयी...

सुमारे दोन लाख चौकिमी विस्तार असलेले थारचे वाळवंट भारत आणि पाकिस्तानमध्ये पसरलेले आहे. यातील बहुतांश भाग वालुकामय आहे. येथे वाळूचे मोठमोठे ढीग असून, ते वाहत्या वाऱ्यामुळे आपली जागा बदलत असतात.

चीनमध्ये असलेल्या ताकलामाकान वाळवंटाचा विस्तार सुमारे 2 लाख 70 हजार चौकिमी आहे. येथे मनुष्यवस्ती फार विरळ आहे.

अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये पसरलेल्या सोनोरन वाळवंटाचा विस्तार 3 लाख 10 हजार चौकिमी आहे.

अमेरिकेतील कोलोराडो पठाराचा विस्तार सुमारे 3 लाख 37 हजार चौकिमी आहे.

अमेरिकेतील सीरियन वाळवंटाचा विस्तार 4 लाख 92 हजार चौकिमी आहे.

पॅटागोनियन वाळवंट हे अर्जेंटिना आणि चिली या देशांमध्ये पसरलेले आहे. या वाळवंटाचे क्षेत्रफळ 6 लाख 20 हजार चौकिमी आहे.

दक्षिण आफ्रिकेत असलेल्या कालाहारी वाळवंटाचा समावेश जगातील सर्वात मोठ्या वाळवंटांमध्ये होतो. त्याचे क्षेत्रफळ 9 लाख चौकिमी इतका आहे.

चीन आणि मंगोलिया या देशांमध्ये पसरलेल्या गोबीच्या वाळवंटाचा विस्तार हा 10 लाख चौकिमी इतका आहे.

अरेबियन वाळवंट हे इराक, जॉर्डन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमीराती आणि येमेन या देशांमध्ये पसरलेले आहे. या वाळवंटाचा विस्तार 23 लाख 30 हजार चौकिमी आहे.

सहारा महावाळवंट हे अल्जीरिया, चाड, इजिप्त, इरिट्रिया, लीबिया, माली, मोरिटानिया या देशात पसरलेले आहे.

आर्क्टिक प्रदेश अलास्का, कॅनडा, फिनलँड, ग्रीनलँड, आइसलँड, नॉर्वे, रशिया आणि स्वीडन या देशांमध्ये पसरलेला आहे.

संपूर्ण बर्फाच्छादित असलेले अंर्टार्क्टिका खंड पूर्णपणे निर्मनुष्य आहे. काही संशोधक आणि हौशी पर्यटक वगळता सहसा इथे कुणीही जात नाहीत.