ही आहेत मंगळ ग्रहाची खास वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 03:43 PM2018-12-04T15:43:23+5:302018-12-04T16:05:49+5:30

आपल्या पृथ्वीशी साधर्म्य साधणारा सूर्यमालेतील एकमेव ग्रह म्हणजे मंगळ. मंगळग्रहावर भविष्यात जीवसृष्टी नांदू शकते असा शास्त्रज्ञांचा अंदाज असल्याने या ग्रहाविषयीचे कुतुहल वाढले आहे. अशा या मंगळग्रहाविषयी जाणून घेण्यासारख्या काही गोष्टी

मंगळ ग्रह सूर्यापासून सुमारे 22.72 कोटी किमी, तर पृथ्वीपासून सुमारे 11.88 कोटी किमी अंतरावर आहे.

पृथ्वी आणि मंगळावरील गुरुत्वाकर्षण वेगवेगळे आहे. त्यामुळे पृथ्वीवर 45 किलो वजन असलेली वस्तू चंद्रावर 17 किलो वजनाचीच भरते.

मंगळ ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 687 दिवस लागतात. म्हणजेच मंगळ ग्रहावर एक वर्ष 687 दिवसांचे असते.

मंगळग्रहावरील एका दिवसाचा कालावधी पृथ्वीवरील दिवसापेक्षा किंचित अधिक आहे. मंगळ ग्रहावरील दिवस हा 24 तास 37 मिनिटांचा असतो.

मंगळग्रहावर थंडी, वादळे आणि वावटळी पृथ्वीच्या तुलनेत अधिक येतात. पण इतर ग्रहांच्या तुलनेत मंगळ हाच वास्तव्य करण्यासाठी उपयुक्त ग्रह आहे. उन्हाळ्यात येथील तापमान 30 अंशापर्यंत पोहोचते, तर हिवाळ्यात उणे 140 पर्यंत घसरते.

मंगळ ग्रहावर पृथ्वीप्रमाणेच ऋतुचक्र आढळते. मात्र पृथ्वीच्या तुलनेत येथील ऋतूंचा कालावधी दुप्पट असतो.

मंगळग्रहाचे आकारमान पृथ्वीच्या निम्मे आहे. तर मंगळ ग्रहाचे वजन पृथ्वीपेक्षा एक दशांश आहे.

मंगळ ग्रहाला फोबोस आणि डेमिओस असे दोन चंद्र आहेत.