These countries have the most neighbor Countries
या देशांना लाभले आहेत सर्वाधिक शेजारी By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 12:41 PM2020-01-07T12:41:06+5:302020-01-07T13:13:42+5:30Join usJoin usNext या जगात सुमारे दोनशेहून अधिक देश आहेत. या देशांपैकी बहुतांश देशांची सीमा कुठल्या ना कुठल्या देशांच्या सीमेला लागलेली आहे. काही देशांच्या सीमेवर मोजकेच देश आहेत. तर काही देशांच्या सीमांवर अनेक शेजारी देश आहेत. आज आपण जाणून घेऊयात सर्वाधिक शेजारी देश लाभलेल्या काही देशांविषयी जर्मनी सर्वाधिक देशांचा शेजार लाभलेल्या देशांच्या यादीत जर्मनीचा पाचवा क्रमांक लागतो. जर्मलीला नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, झेक प्रजासत्ताक, पोलंड, डेन्मार्क आणि लक्झेंबर्ग असे नऊ शेजारी देश लाभले आहेत. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो या देशाला बुरुंडी, रवांडा. युगांडा, दक्षिण सुदान, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, कांगो रिपब्लिक, अंगोला, झाम्बिया आणि टंझानिया अशा नऊ देशांचा शेजार लाभलेला आहे. सर्वाधिक शेजारी असलेल्या देशांच्या यादीत डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो चौथ्या क्रमांकावर आहे. ब्राझील सर्वाधिक शेजारी असलेल्या देशांच्या यादीत ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलला एकूण 10 देशांचा शेजार लाभला आहे. ब्राझीलच्या शेजाऱ्यांमध्ये सूरीनाम, गुएना, फ्रेंच गुएना, व्हेनेझुएला, कोलंबिया, पेरू, बोलिव्हिया, उरुग्वे, पॅराग्वे आणि अर्जेंटिना या देशांचा समावेश आहे. चीन सर्वाधिक शेजारी असलेल्या देशांच्या क्रमवारीत चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनला 13 शेजारी देश लाभले आहेत. यामध्ये भारत, मंगोलिया, कझाखस्तान, उत्तर कोरिया, रशिया, किर्गिस्तान, तजाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश आहे. रशिया क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश असलेला रशिया सर्वाधिक शेजारी असलेल्या देशाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. रशियाला फिनलँड, एस्टोनिया, लाटव्हिया, लिथुआनिया, बेलारूस, युक्रेन, जॉर्जिया, अझरबैजान, कझाकस्तान, चीन, मंगोलिया, उत्तर कोरिया आणि नॉर्वे या देशांचा शेजार लाभला आहे. यापैकील 12 देश रशियाच्या मुख्य भूमीशेजारी तर लिथुआनिया आणि पोलंड हे देश रशियाच्या मुख्य भूमीपासून काही अंतरावर असलेल्या कॉलिनग्राड प्रांताला लागून आहेत. भारत या यादीतील पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा समावेश नसला तरी भारताला एकूण सात देशांचा शेजार लाभला आहे. यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. त्याशिवाय भारताच्या सागरी सीमेच्या अगदी जवळ श्रीलंका आणि मालदीव हे देश आहेत. टॅग्स :आंतरराष्ट्रीयरशियाचीनब्राझीलजर्मनीभारतInternationalrussiachinaBrazilGermanyIndia