Three doctors have committed suicide by jumping out of a hospital window in Russia mac
खिडकीतून पडले की पाडले?; सरकारवर टीका करणाऱ्या 'त्या' तीन डॉक्टरांसोबत नेमके काय घडले By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 01:35 PM2020-05-07T13:35:35+5:302020-05-07T13:43:44+5:30Join usJoin usNext जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरातील 212 देशांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 94,261 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 38 लाखांवर पोहचली आहे. तर 2 लाख 64 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातील सर्व सरकार विविध उपययोजना करत आहेत. तसेच डॉक्टर, नर्स अहोरात्र मेहनत करुन रुग्णांवर उपचार करत आहे. या दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रशियातील रुग्णालयाच्या खिडकीतून तीन डॉक्टरांनी उडी मारुन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला असून एक डॉक्टरांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिन्ही डॉक्टरांना कोरोना व्हायरस संदर्भात गोपनिय माहिती मिळाली होती. तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वी रशिया सरकारच्या कामकाजावर टीका देखील केली होती. काही दिवसांपूर्वी रशियामधील वैद्यकीय कर्मचार्यांनी संसर्ग नियंत्रण प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्याचप्रमाणे संरक्षणात्मक उपकरणांच्या अभावाचा प्रश्न देखील मांडण्यात आला होता. यानंतर या संदर्भात अनेक डॉक्टरांनी तक्रार दिल्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व दबावापोटी तर डॉक्टरांनी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं नाही ना, असा सवालही आता सोशल मीडियावर उपस्थित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे तीन डॉक्टरींनी नक्की आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला, या संदर्भात तेथील स्थानिक पोलीस तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.टॅग्स :कोरोना वायरस बातम्यारशियाआत्महत्याडॉक्टरपोलिसcorona virusrussiaSuicidedoctorPolice