संयुक्त लष्करी सरावाचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 04:08 PM2019-09-13T16:08:28+5:302019-09-13T16:14:43+5:30

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध मजबूत होत आहेत. वॉशिंग्टनमध्ये भारत आणि अमेरिकेचे जवान यांच्यात संयुक्तरित्या युद्ध सराव सुरु आहे.

भारत आणि अमेरिका दरम्यान होणारा हा संयुक्त लष्करी सराव दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांना ब्रिगेड स्तरावर संयुक्त नियोजनासह बटालियन स्तरावर एकात्मिक पद्धतीने प्रशिक्षण देण्याची संधी देईल.

वॉशिंग्टनमधील जॉइंट बेस लुईस मकार्ड (Joint Base Lewis–McChor) येथे जवानांचा युद्ध सराव सुरु आहे.

भारत आणि अमेरिका या दोन देशातील वैकल्पिकरित्या आयोजित होणारा संयुक्त सैन्य अभ्यास ‘युध्द अभ्यास 2019’ ही 15 वी आवृत्ती आहे.

भारत आणि अमेरिकेचे लष्कर एकत्रितपणे विविध प्रकारची आव्हाने आणि धोके यापासून बचाव करण्यासाठी ट्रेनिंग आणि प्लॅनिंगवर काम करत आहे.