मोदी, ट्रम्प नव्हे, 'या' मंडळींना सर्वाधिक सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 03:35 PM2020-02-15T15:35:57+5:302020-02-15T15:42:18+5:30

प्रिन्स हॅरी मेगन मर्केल स्वत:च्या सुरक्षेवर ७,५०,००० अमेरिकन डॉलर खर्च करतात. या दोघांच्या सुरक्षेसाठी २० अधिकारी सदैव तैनात असतात. या दाम्पत्यानं त्यांच्या बंगल्यावर ५०,००० युरो खर्च केले आहेत. या बंगल्याच्या काचा साऊंडप्रूफ असून त्यातलं बाथरुम इको-हिटेड आहे.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे, शस्त्रसज्ज सुरक्षा कर्मचारी आणि फिंगरप्रिंट रिडर्स आहेत. रसायन हल्ल्यापासून बचाव करता येईल, अशी खोली त्यांच्या बंगल्यात आहे. यावर १० लाखांपेक्षाही अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे.

फेसबुकचा संस्थापक झकरबर्गनं २०१८ मध्ये स्वत:च्या सुरक्षेवर २० मिलियन डॉलर खर्च केला होता. उच्च प्रशिक्षित सुरक्षा अधिकारी कायम त्याच्या संरक्षणासाठी सज्ज असतात.

चीनचे अध्यक्ष शी जिंगपिंग यांच्या सुरक्षेसाठी सेंट्रल सॅक्रेट ब्युरो सदैव तत्पर असतात. जिंगपिंग यांच्या सुरक्षेसाठी ५ हजार सुरक्षा कर्मचारी, ड्रोन्स, हेलिकॉप्टर्स तैनात असतात.

सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान कायम वादग्रस्त कृतींमुळे चर्चेत असतात. २०१७ मध्ये सत्तेत येताच त्यांनी सौदीचं लष्कर आणि सुरक्षा यंत्रणाचं एकत्रीकरण केलं. त्यांच्या आसपास १ हजार सुरक्षा रक्षक हजर असतात. यात सैनिकांसह, सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांचा समावेश आहे. सलमान यांनी आतापर्यंत सुरक्षेवर २० बिलियन डॉलर्स खर्च केले आहेत.

ब्रिटनची राणी क्वीन एलिझाबेथ यांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा पथक तैनात असतं. राणीचा मार्ग मोकळा करण्याचं आणि एखाद्या आपत्कालीन परिस्थितीतून राणीला सुखरुप बाहेर काढण्याचं कौशल्य या पथकाकडे आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी स्पेशल प्रोटेक्शन गार्डचे कमांडो तैनात असतात. मोदींच्या सुरक्षेत दिल्ली पोलिसदेखील महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी ५०० एसपीजी कमांडोंसह इतर विभागांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर आहे. मोदींच्या ताफ्यात ८ बीएमडब्ल्यू कार आणि १ मर्सिडिज अ‍ॅम्ब्युलन्स आहे.

उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग अन यांच्या सुरक्षेत गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी वाढ करण्यात आली. अमेरिका आणि दक्षिण कोरियाकडून अन यांना मारण्याची योजना आखली जात असल्यानं त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली. मार्शल आर्ट्समध्ये निष्णात असलेलं पथक अन यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतं. तब्बल ९० हजार कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी हजर असतात.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेची जबाबदारी १ हजार जणांच्या पथकावर आहे. रासायनिक, जैविक, आण्विक हल्ला परतवून लावण्याची क्षमता असलेली टीम सदैव त्यांच्यासोबत असते. त्यांच्या ताफ्यात जवळपास ५० गाड्या आहेत. यामधून त्यांचे सुरक्षा रक्षक प्रवास करतात.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या संरक्षणासाठी २ ते ३ हजार कर्मचारी साध्या वेशात तैनात असतात. पुतीन कोणत्याही खोलीत प्रवेश करण्यापूर्वी त्यांचं पथक संबंधित खोलीचा आढावा घेतं. त्यांची गुप्तचर यंत्रणा आसपास असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवते.