top 5 unusual houses in the world
जगभरातील 'ही' घरं पाहाल तर नक्कीच चक्रावून जाल! By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 02:49 PM2018-08-20T14:49:49+5:302018-08-20T15:38:14+5:30Join usJoin usNext सुंदर, आलिशान आणि रम्य वातावरणात स्वत:च एक घर असावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. काहीजण लहान घरात देखील सुखासमाधानाने राहतात, तर काहींना मोठं घर खुणावत असतं. मात्र जगात अशी काही अजब घरं आहेत की जी पाहिल्यावर तुम्हीही नक्कीच चक्रावून जाल. जपानच्या टोकियो शहरात एक सुंदर काचेचं पारदर्शक घर आहे. बाथरूम सोडून सर्व भिंती या काचेच्या आहेत. त्यामुळे साहजिकच या घरातून बाहेरचा संपूर्ण परिसर दिसतो. तसेच बाहेरच्या मंडळींनाही घरातील सर्व गोष्टी पाहता येतात. वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांना राहण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. मात्र पोलंडमध्ये एक असं घर आहे जे जगातील सर्वात स्लिम हाऊस आहे. या घराची रुंदी केवळ 3 ते 4 फूट आहे. या घराला दोन मजले असून सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. पोर्तुगालमध्ये दगडांचं प्रसिद्ध घर आहे. या घराचा आकार अजब असून चार प्राकृतिक दगडाच्या मदतीने हे घर तयार करण्यात आले आहे. आता या घरामध्ये म्युझियम तयार करण्यात आले आहे. जर्मनीमध्ये जगातील सर्वात लहान घर असून या घराचं क्षेत्रफळ 1 वर्ग मीटर आहे. या घराचं वजन 40 किलोग्रॅम असल्याने हे इतर ठिकाणी घेऊन जाता येऊ शकतं. लाकूड आणि फायबरच्या मदतीने हे घर तयार करण्यात आलं आहे. जपानच्या टोकियो शहरात एक स्लाईड हाऊस आहे. या घराचं वैशिष्ट्य म्हणजे या घरात कुठेही पायऱ्या नसून सर्वत्र स्लाईड आहेत. या घराच्या मालकाने आपल्या लहान मुलांना घरामध्ये आरामात राहता यावं यासाठी अशी रचना केली आहे. टॅग्स :जपानजर्मनीपोर्तुगालJapanGermanyPortugal