यंदाच्या वर्षातील पहिल्या पूर्ण सूर्यग्रहणाची मनोहारी दृश्यं पाहिलीत का? By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 02:56 PM 2019-07-03T14:56:48+5:30 2019-07-03T15:00:43+5:30
यंदाच्या वर्षातील पहिलं संपूर्ण ग्रहण चिली, अर्जेंटिना आणि ब्राझीलमध्ये पाहायला मिळालं.
यावेळी भारतात रात्र असल्यानं ग्रहण दिसू शकलं नाही.
वर्षभरातील पहिलं सूर्यग्रहण पाहण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये विशेष तयारी करण्यात आली होती.
नासानं सूर्यग्रहणाचे सुंदर फोटो प्रसिद्ध केले आहेत.
चिलीमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजून 21 मिनिटांनी सूर्यग्रहण दिसलं.
एक कडा अंधारात गेलेला सूर्य यावेळी पाहायला मिळाला. या सुंदर दृश्यानं अनेकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं.