रशियामध्ये बस आणि ट्रेनचा भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 15:53 IST2017-10-06T15:50:57+5:302017-10-06T15:53:37+5:30

रशियामध्ये बस आणि ट्रेनचा भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू
मॉस्को येथे पॅसेंजर बसला ट्रेनने धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी मॉस्कोपासून 110 किमी अंतरावर असणा-या व्लादिमीर शहराजवळ हा अपघात झाला
रशियामध्ये बस आणि ट्रेनचा भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन सेंट पीटर्सबर्ग येथील पश्चिम शहरापासून ते पूर्व मॉस्को येथील निजनी - नोवोग्राद येथे चालली होती. पहाटे 3.29 च्या सुमारास हा अपघात झाला.
रशियामध्ये बस आणि ट्रेनचा भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू
बसमध्ये असणा-या सर्व लोकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मंत्रालयाने रेल्वे ट्रॅकजवळील फोटो प्रसिद्ध केले आहेत. तसंच ट्रेनमधील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती दिली.
रशियामध्ये बस आणि ट्रेनचा भीषण अपघात, 19 जणांचा मृत्यू
रशियामध्ये बस दुर्घटना होण्याचं प्रमाण जास्त आहे. याआधी ऑगस्ट महिन्यात बांधकाम कामगारांना घेऊन जाणा-या एका बसचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता.