Twitter विकत घेऊन खळबळ उडवणाऱ्या Elon Musk जवळ आहेत या ६ महागड्या गोष्टी, कोट्यावधी आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 05:35 PM2022-04-27T17:35:40+5:302022-04-27T18:05:16+5:30

Elon Musk Net Worth : एका वर्षात जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ३५ व्या क्रमांकावर राहणारा एलन मस्क पहिल्या नंबरवर आला होता. तो अनेक मोठ्या कंपन्यांचा फाउंडर आहे.

Elon Musk Net Worth: जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक एलन मस्क (Elon Musk) ने ४४ बिलियन डॉलर म्हणजे ३ लाख ३६ हजार कोटी रूपयांना मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर खरेदी केलं. ही टेक विश्वातील सर्वात मोठी डील झाली आहे. ट्विटर खरेदी केल्यानंतर एलन मस्कच्या एकूण संपत्तीमध्येही वाढ होणार आहे. एका वर्षात जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ३५ व्या क्रमांकावर राहणारा एलन मस्क पहिल्या नंबरवर आला होता. तो अनेक मोठ्या कंपन्यांचा फाउंडर आहे. यात 'SpaceX', 'Tesla', 'Neuralink', 'PayPal', आणि 'The Boring Company' सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून एलन दररोज अब्जो रूपये कमाई करतो.

सध्या एलन मस्कची नेटवर्थ २६,४६० कोटी डॉलरच्या जवळपास आहे. जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती असण्यासोबतच एलन मस्कला लक्झरी वस्तूंची फार आवड आहे. अब्जो रूपयांच्या बंगल्यापासून ते कोट्यावधी रूपयांच्या जेटपर्यंत एलन मस्क अनेक लक्झरी वस्तूंचा मालक आहे.

अब्जो रूपयांची कंपनी - एलन मस्क जगातील प्रसिद्ध स्पेस कंपनी SpaceX चा मालक आहे. सध्या या कंपनीची मार्केट व्हॅल्यू साधारण ७४ बिलियन डॉलर इतकी आहे. एलन मस्क इलेक्ट्रिक कार कंपनी Tesla चा सीईओ आहे. सध्या टेस्ला कंपनीची मार्के व्हॅल्यू ५,३८२ कोटी डॉलरच्या आसपास आहे. त्यासोबतच टेस्लाची सहायक कंपनी SolarCity ची मार्केट व्हॅल्यू साधारण ३.५ बिलियन डॉलर आहे. तसेच तो 'Neuralink', 'PayPal', 'The Boring Company' या कंपन्यांचा मालक आहे.

४७५ कोटी रूपयांचं 'रॉकेट लॉन्चिंग व्हेइकल' - SpaceX चा मालक एलन मस्ककडे जगातले सर्वात चांगले रॉकेट लॉन्च करणारे वाहन आहेत. मस्कच्या रॉकेट लॉन्चिंग व्हेइकलचं नाव 'Falcon 9' आहे. जे अंतराळात रॉकेट लॉन्च करण्यासाठी दोन टप्प्यातील ऑर्बिट लिफ्ट वाहन आहे. हे SpaceX कंपनीकडून बनवण्यात आलेल्या सर्वात क्रांतिकारी डिझाइनपैकी एक आहे. याची किंमत ६२ मिलियन डॉलर म्हणजे ४७५ कोटी रूपये इतकी आहे.

१६५ कोटी रूपये किंमतीचे बंगले - एलन मस्ककडे अनेक लक्झरी बंगले आहेत. यातील पहिला बंगला हा अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील Bel Air Mansion हा आहे. या आलिशान बंगल्याची किंमत १७ मिलियन डॉलर म्हणजे १३० कोटी रूपये इतकी आहे. यानंतर लॉस एंजलिसमध्ये त्याचा दुसरा बंगला आहे. त्याची किंमत ३५ कोटी रूपये आहे. त्यासोबतच त्याचे आणखीही काही बंगले आहेत.

लक्झरी कार - एलन मस्कच्या गॅरेजमध्ये अनेक लक्झरी कार्स आहेत. यात ९२ कोटी रूपयांची McLaren F1 Hypercar, Mclaren F1 ७.६६ कोटी रूपये, Lotus Esprit submarine ७ कोटी रूपये, Tesla Roadster १.५३ कोटी रूपये, 1967 E-Type Jaguar ८० लाख रूपये, Audi Q7 ५४ लाख रूपये, आणि Hamann BMW M5 ३८ लाख रूपये यांचा समावेश आहे.

प्राइवेट जेट आणि यॉट्स - एलन मस्कला केवळ लक्झरी कार्सचीच नाही तर प्रायव्हेट जेट आणि यॉट्सचीही आवड आहे. एलन मस्ककडे काही प्रायव्हे यॉट्स आहेत ज्यांची किंमत ५,३५९ कोटी रूपयांच्या आसपास आहे. तसेच त्याच्याकडे एक फॅन्सी प्रायव्हेट जेटही आहे. ज्याची किंमत ५४ लाख रूपयांच्या आसपास आहे. (Image Credit - Youtube)

टेस्ला डायमंड रिंग - ट्विटरचा मालक एलन मस्ककडे एक महागडी डायमंड रिंगही आहे. सॉलिड प्लॅटिनम आणि कस्टम कट डायमंड बॅगूलेट्सपासून तयार या रिंगच्या मागे Tesla चा T आहे. जो ट्रिलियन कट डायमंडने बनला आहे. या सुंदर रिंगची किंमत ४० हजार डॉललर म्हणजे ३०.६३ लाख रूपये आहे.