चीन, मकाऊ आणि हाँगकाँगला चक्रीवादळाचा फटका, जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 05:05 PM2017-08-24T17:05:09+5:302017-08-24T17:24:50+5:30

चीनच्या समुद्रकिना-यावर 'टायफून' वादळ धडकलं आहे. मकाऊ आणि हाँगकाँग शहरालाही या वादळाचा मोठा फटका बसला आहे.

मकाऊ आणि हाँगकाँग शहरातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

दक्षिण चीनमध्ये टायफून वादळामुळे एकूण बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

मकाऊमध्ये मेक्का आणि पोर्तुगीज कॉलनीत एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारने दिली आहे.

बुधवारी सकाळी दक्षिण वादळामुळे काही ठिकाणी लँडस्लाईड झालं. यामुळे मकाऊमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.

मकाऊमध्ये आलेलं हे वादळ गेल्या 53 वर्षातील सर्वात मोठं वादळ असल्याची माहिती सरकारने दिली आहे.

पाणी आणि वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सरकार पुर्ण प्रयत्न करत आहे.

समुद्रकिनारी असलेल्या अनेक परिसरांना उंच लाटांचा फटका बसला असून झाडे कोलमडून पडली आहेत.

हाँगकाँगमध्ये 700 हून अधिक झाडं पडली असून, 100 हून अधिक जणांना वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

सुरुवातीला आलेलं वादळ छोटं होतं, मात्र नंतर त्याचा वेग वाढला आणि रौद्र रुप धारण केलं.

हाँगकाँगमध्ये अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली असून वाहतूक ठप्प झाली आहे.

वादळामुळे अनेक व्यवसाय ठप्प पडले असून अर्थव्यवस्थेवर परिणाम होताना दिसत आहे

टॅग्स :चीनchina