UK designates Omicron sub-lineage a variant under investigation
Omicron च्या सब व्हेरिएंटमुळे वैज्ञानिक चिंतेत; भारतासह ४० देशांसाठी धोकादायक By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 10:38 PM2022-01-22T22:38:35+5:302022-01-22T22:43:06+5:30Join usJoin usNext कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या सब व्हेरिएंटवर वैज्ञानिकांनी लक्ष केंद्रीत केले आहे. या सब व्हेरिएंटमुळे भविष्यात कोरोना महामारीचा प्रसार कसा प्रभावी ठरु शकतो याचा शोध वैज्ञानिकांकडून घेणे सुरु आहे. सुरुवातीच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं अलीकडच्या काळात सर्वात धोकादायक स्ट्रेन बनला आहे. परंतु ब्रिटीश आरोग्य अधिकाऱ्यांच्या BA 2 नावाच्या व्हेरिएंटचं अनेक रुग्ण आढळले आहेत. तर आंतरराष्ट्रीय डेटानुसार अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने हा व्हेरिएंट पसरण्याची शक्यता आहे. यूके आरोग्य सुरक्षा संस्थेनं या महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत ब्रिटनमध्ये BA 2 चे 400 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. जवळपास ४० देशांमध्ये ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचा शोध लागला आहे. त्यात भारत, डेनमार्क, स्वीडनसारख्या काही देशांना समावेश आहे. भारतातही अलीकडेच ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचे रुग्ण सापडत असल्याची माहिती आहे. यूकेएचएसएने शुक्रवारी ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंट BA 2 च्या तपासणीसाठी यादीत टाकलं आहे. कारण या व्हेरिएंटचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. ब्रिटनमध्ये सध्या कोविड १९ चे सर्वाधिक कारण BA 1 आहे. ब्रिटीश अथॉरिटीनं सांगितले आहे की, व्हायरल जीनोमच्या बदलाच्या प्रभावाबद्दल अद्यापही अनिश्चितता आहे. ज्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. याच काळात भारत आणि डेनमार्क येथे BA 2 प्रकरणात वाढ होत आहे. ओमायक्रॉन कोरोनाच्या व्हायरसच्या विविध व्हेरिएंटमध्ये सर्वात धोकादायक मानला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २६ नोव्हेंबरला हा चिंताजनक असल्याचं सांगत त्याला ओमायक्रॉन नाव दिलं. चिंताजनक स्वरुप WHO च्या सर्वात धोकादायक श्रेणीत येते. दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमायक्रॉन’ (B.1.1.529) व्हेरिएंटनं जगासाठी चिंता निर्माण केली आहे. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, ५ पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा व्हेरिएंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमायक्रॉनला वेगाने पसरणारा व्हेरिएंट म्हणून संबोधले आहेटॅग्स :कोरोना वायरस बातम्याcorona virus